Gas Cylinder Shortage: गॅस सिलिंडर टंचाईचा ग्रामीण भागात परिणाम; महिलांचा मोर्चा चुलीकडे

रायगडमधील वनसंपदेवर नवे संकट; सरपणाच्या किमतीमध्येही झालीय मोठीवाढ
Gas Cylinder Shortage
Gas Cylinder ShortagePudhari
Published on
Updated on

संतोष उतेकर

सुधागडः स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर वेळेवर मिळेल की नाही याबाबतची शाश्वती नसल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा चुलीकडे मोर्चा वळवला आहे. दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी जंगलातील लाकूडफाटा गोळा करून त्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जात आहे. यंदा सरपणाचा साठा नेहमीपेक्षा वाढल्याने वनसंपदेवर ताण येण्याची शक्यता येत आहे.

काही वर्षात घराघरात गॅस पोचवण्याने ग्रामीण भागातील चुलीचा वापर कमी झाला होता. जोडणी मागणाऱ्या बहुतांशा कुटुंबांना तोच व्यावसायिकांनाही गॅस जोडणे मिळाल्या जिल्ह्यात सध्या साडेसात लाख जोडण्या असून हे प्रमाण ऐकून कुटुंब संख्यांच्या सुमारे ९०% आहे. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत ६९ हजार ८८१ अल्प उत्पादन गटातील कुटुंबांना गॅस जोडण्या दिले आहेत.

Gas Cylinder Shortage
Panvel Water Crisis: पनवेलच्या जीवनवाहिन्या कोरड्या ठाक; १८ हजार नागरिकांची पाण्यासाठी वणवण

दरम्यान वाढत्या गॅस दरांसह सिलेंडर पुरवठ्यातील आणि शक्तीमुळेच ग्रामीण भागातील कुटुंब यांची चिंता वाढली. नोंदणी केल्यानंतरही सिलेंडर नेमका कधी मिळेल याची खात्री नसल्याने महिलांनी पर्यायी व्यवस्था म्हणून सरपणसाठवण्यास सुरुवात केली आहे. अनेक गावांमध्ये घराजवळ सरपनाचे मोठे डिंक दिसून येत आहेत.

वाढत्या मागणीमुळे सरपणाचा किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी ५०रुपयांना मिळणारा सरपणाची एक मुळी आता दीडशे रुपये पेक्षा अधिक दराने विकली जात आहेत. त्यामुळे काही जणांनी याकडे उत्पादनाचे साधन म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. खोपी पुन्हा तयार-सरपणाची जास्त गरज नसल्याने मध्यंतरीच्या कालावधीत मोडकळीस पडलेल्या लाकडी फाटा जमवून ठेवण्याच्या खोपी पुन्हा नव्याने तयार केल्या आहेत.

Gas Cylinder Shortage
Mumbai Waterlogging: पाणी तुंबणारच... अधिकाऱ्यांचा बळी जाणारच

ग्रामीण भागात याची जागा घरांच्या शेजारीच असतात त्यामुळे त्याची स्वच्छता केली जात असे अनेक वर्षे सरपण ठेवण्याची गरज न भासल्याने अशा खोपी पूर्णपणे दुर्लक्षित झाल्या होत्या त्याची नव्याने डागडूजी करवी लागत आहे.

आगोटीत लाकुडफाटा साठवणुकीची लगबग सध्या आगोटीची कामे होत असताना, नारळ सुपारीच्या वाढीतील लाकूडफाटा जमा करण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी वाढीतील स्वच्छतेसाठी ही साफसफाई केली जात असे आता सुकलेले झाड जमा करून खोपीत व्यवस्थित साठवून ठेवायचे लगत आहेत.

आंब्यांचा हंगाम संपल्यानंतर छाटणीमध्ये पडणाऱ्या फांद्या पावसाळ्यात अर्पण म्हणून जपून ठेवण्यावर भर दिला जात आहे. अल्प उत्पन्न गटावर संकट घरगुती घ्यायच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना गरीब कुटुंबातील महिलांना प्रत्येक वेळेला घ्यायचे पैसे देणे शक्य होत नसल्याने अनेक महिलांनी गॅस जोडीचा वापर कमी केला घरात घ्या सगळ्यांचा आहेत. परंतु रिफिलिंग करून घेणे परवडत नसल्याने रिकामी सिलेंडर पडून आहेत.

गॅस सिलेंडर वेळेत मिळेल याची खात्री नसल्याने पूर्वीचा मार्ग निवडला आहे हा लाकूड फाटा मालकी जागेतला आहे आंबा नारळ फणस तुटलेल्या फांद्या सरपंच म्हणून साठवत आहोत

- नूतन उतेकर गृहिणी तोरणकेवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news