Raigad News | रखडलेले रेशन आता ऑफलाईन मिळणार

मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर धान्य वितरणाची जबाबदारी
ration
रखडलेले रेशन आता ऑफलाईन मिळणार
Published on
Updated on

रायगड : सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने रास्तभाव धान दुकानांतील जुलै महिन्यातील धान्यवितरण काही ठिकाणी रखडले आहे. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासुन वंचित राहून नये यासाठी ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे. त्या - त्या कार्यक्षेत्रातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर धान्य वितरण प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तालुका स्तरावरील अधिकार्‍यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रासतभाव दुकानांमध्ये 4जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या आहे. राज्यात काही दिवसापासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीनमधुन अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात आली आहे. ही ऑफलाईन अन्नधान्याचे वितरण सुविधा फक्त जुलै 2024 मधील अन्नधान्य वितरणाकरीता उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे केवळ गहु, तांदुळ व साखरेचे ऑफलाईन वितरण करता येणार आहे. आनंदाचा शिधा, झचॠघध इरसी तसेच अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना करावयाचे साडी वाटप यांचे वितरण सर्व्हर समस्येचे निराकरण झाल्यानंतर ऑनलाईन पध्दतीनेच करावयाचे आहे.

ration
Raigad News | लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात रायगड आघाडीवर

सदर ऑफलाईन अन्नधान्याचे वितरण हे शासकीय अधिकारी - कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात यावे व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात तसेच सोबत जोडलेले ऑफलाईन धान्य वितरणाचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. सर्व रास्त भाव धान्य दुकानांद्वारे करण्यात आलेल्या ऑफलाईन धान्य वितरणाची माहिती एका नमुन्यात भरायाची आहे.

रास्त भाव धान्य दुकानदार यांनी ऑफलाईन धान्य वाटप केलेल्या अन्नधान्याचा तपशील ऋझड ङेसळप अ‍ॅपद्वारे खचझऊड पोर्टलवर भरणे बंधनकारक राहणार आहे. रास्तभाव धान्य दुकानदार यांनी खचझऊड पोर्टलवर ऑफलाईन केलेल्या धान्य वितरणाचा तपशील भरणेकरीता त्यांचे खचझऊड पोर्टलवरील लॉगिनचा वापर करायचा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news