Raigad News | रस्ता भरकटलेल्या 12 ट्रेकर्संची सुखरूप सुटका

नेरळ पोलिसांनी स्थानिक तरुणांची घेतली मदत
Raigad News | Safe rescue of 12 trekkers who lost their way
रस्ता भरकटलेल्या 12 ट्रेकर्संची सुखरूप सुटका Pudhari Photo
Published on
Updated on

नेरळ : माथेरान डोंगर रांगेत पॅनोरमा पाँईट लगत असलेला शिवकालीन विकटगड हा ट्रेकिंगसाठी मुख्य अकर्षक असल्याने येथे ट्रेकींगसाठी मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स हे येत असतात. त्याप्रमाणे ट्रेकींगसाठी आलेले 12 ट्रेकर्स हे वाढलेल्या गवतामुळे रस्ता भरकटल्याने व योग्य रस्ता सापडला नसल्याने अडकले होते. या भरकटलेल्या तरुण ट्रेकर्सनी शेवटी पोलीस हेल्पलाईनकडे मदत मागितली असता नेरळ पोलिसांनी नेरळ मधील पेब किल्ल्याचे पायथ्याशी वसलेल्या आनंदवाडी येथील स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने पेब किल्ला येथे रस्ता भरकटून अडकलेल्या 12 ट्रेकर्संची सुखरूप सुटका केली.

29 ऑक्टोबर रोजी मुंबई घाटकोपर येथील 12 जणांचा ग्रुप हा नेरळ आनंदवाडी येथून ट्रेकिंगसाठी रवाना झाला होता. हा 12 जणांचा ग्रुप खाली उतरण्यासाठी रस्ता शोधत होता. रस्ता सापडत नसल्याने व या ग्रुप मध्ये पाच मुलींचा समावेश असल्याने व सर्व ट्रेकर्स हे साधारण 20 वर्ष वयोगटातील असल्याने घाबरल्याने शेवटी नाईलाजास्तव त्यांनी साडेचार वाजता पोलीस हेल्पलाईनवर संपर्क केला .संबंधित कॉल पोलीस हेल्पलाईन वरून नेरळ पोलीस यांच्याकडे वर्ग झल्याने,पेब किल्ल्यावर कोणी ट्रेकर्स ग्रुप रस्ता भरकटले असल्याची माहिती नेरळ पोलीस यांना मिळताच नेरळ मधील पेब किल्ल्याचे पायथ्याशी वसलेल्या आनंदवाडी येथील स्थानिक आदिवासी तरुण सुरेश निरगुडा, आकाश निरगुडे आणि रवी आगीवळे यांच्या मदतीने पोलीस हवालदार महेश खंडागळे आणि पोलीस शिपाई निरंजन दवणे यांनी पाच वाजता किल्ल्यावर जाण्यास सुरुवात करत किल्ल्यावर पोहचून त्या सर्व 12 तरुण ट्रेकर्संचा शोध घेऊन साधारण साडेआठ वाजता रस्ता चुकलेले सर्व ट्रेकर्स यांना नेरळ पोलीस ठाण्यात सुखरूप आणत सव्वा नऊ वाजता सर्व तरुणांना दोन रिक्षांमधून नेरळ पोलीस ठाणे येथून नेरळ रेल्वे स्थानकात उपनगरीय लोकल पकडण्यासाठी सोडण्यात आले आहे. व या सर्व ट्रेकर्स यांची सुखरूप सुटका केल्याची माहिती ही नेरळ पोलीसांनी पोलीस हेल्पलाईन यांना देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news