Raigad News | शेकडो लोकांना ठगवणारा फरार तोतया अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

संकेत कांबळेला अटक; नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक
Raigad News
तोतया अधिकारी संकेत कांबळे याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

अलिबाग : नेरळ परिसरात अनेकांना सरकारी व निमसरकारी नोकर्‍यांचे अमिष दाखवून मोठया प्रमाणात लोकांकडून पैसे उकळून लोकांना ठगवणारा व गेली काही वर्षापासुन फरार असलेला तोतया अधिकारी संकेत कांबळे याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले आहे.

एक्झिक्युटिव्ह दर्जाचे कपडे तसेच हातामध्ये आय फोन घेऊन अधिकारी वर्गासारखी भाषेचा वापर करून नेरळ पूर्व भागात भाड्याच्या घरात राहणारा राहणारा संकेत कांबळे हा मंत्रालयात गृह विभागात वरिष्ठ पदावर नोकरीत आहे असे भासवून खुद्द पोलिसांना विविध पदांची आमिषे दाखवून, तर अनेकांना नोकर्‍याचे आमिष दाखवून मोठया प्रमाणात लोकांन कडून पैसे ऊकळत अनेकांकडून मोठ्या आर्थिक रकमा जमा करून नेरळ मधून सन 2019 पासून फरार झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात संकेत कांबळे याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात 2, सातारा कराड पोलीस ठाणे 1, खैरवाडी पोलीस ठाणे 2, चेंबूर पोलीस ठाणे 1, अंधेरी पोलीस ठाणे 1, पनवेल ग्रामीण पोलीस ठाणे 1, पुणे खडकवास पोलीस ठाणे 1 असे सात पोलीस ठाण्यात 9 गुन्हे फसवणुकीसह विविध प्रकरणात गुन्हा दाखल आहेत.

लोकांना नोकर्‍यांचे आमिष दाखवून मोठया प्रमाणात लोकां कडून पैसे ऊकळत मोठ्या आर्थिक रकमा जमा करून लोकांना ठगवणारा व सन. 2019 मधील फसवणूकीच्या दोन गुन्हयातील नेरळ पोलीसांच्या हिट लिस्टवर असलेला फरार तोतया अधिकारी संकेत कांबळे हा नांव बदलून नवी मुंबई येथे राहात असल्याची गोपनिय माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे यांना मिळताच नेरळ पोलीसांनी 18 सप्टेंबर 2024 रोजी नवी मुंबई येथील ए पी एम सी पोलीस ठाणे ह6ीत सापला रचून एकूण सात पोलीस ठाण्यासह नेरळ पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या दोन गुन्ह्यातील फरार तोतया अधिकारी संकेत कांबळे वय वर्ष 40 याच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असुन, तोतया अधिकारी संकेत कांबळे याला 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहेत.

शेकडो लोकांना ठगवणारा

मुंबईसह सातार्‍यापयर्र्ंत लोकांना नोकर्‍यांचे आमिष दाखवून मोठया प्रमाणात लोकांकडून पैसे ऊकळत मोठ्या आर्थिक रकमा जमा करून लोकांना ठगवणारा व सन 2019 मधील फसवणूकीच्या दोन गुन्हयातील नेरळ पोलीसांच्या हिट लिस्टवर होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news