उरण : एक ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला आहे. हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला असतानाही रायगडउमधील मच्छीमारांना सरकारकडून मिळणार्या डिझेल कोट्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे हजारो मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा कोटा सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे.
मासेमारी करणार्यांना शासनाकडून मासेमारीसाठी वापरण्यात येणार्या बोटींना वर्षाकाठी 35 हजार लिटर डिझेल दिले जाते. या डिझेलवर शासनाकडून डिझेलवरील व्हॅट किंवा लिटरमागे 18 रुपयांची सूट दिली जात आहे. यालाच मच्छीमार डिझेल परतावा असे म्हणतात. हे तेलावरील अनुदान शासनाच्या मत्स्य विभागाने त्याचा कोटा मंजूर केल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे महिनाभरापासून मच्छीमारांना या कोट्याविना मासेमारी करावी लागत आहे. तर मागील दोन ते तीन महिन्यांचे डिझेलवरील परतावेही थकले आहेत. याचा परिणाम मासेमारीच्या नव्या हंगामावर झाला आहे.
शासनाने पावसाळ्यात घातलेली खोल समुद्रातील मासेमारी बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत झाल्याने मासेमारी जोमाने सुरू झाली आहे. तर 15 ऑगस्टपासून मुंबईतील ससून डॉक ऐवजी उरणच्या करंजा बंदरात सुरू झालेल्या मासळी बाजारामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. स्वस्त दरात मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, कल्याण, अलिबाग, ठाणे येथील व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी हे करंजा बंदरात येऊ लागले आहेत.शासनाने पावसाळ्यात घातलेली खोल समुद्रातील मासेमारी बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत झाल्याने मासेमारी जोमाने सुरू झाली आहे. तर 15 ऑगस्टपासून मुंबईतील ससून डॉक ऐवजी उरणच्या करंजा बंदरात सुरू झालेल्या मासळी बाजारामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. स्वस्त दरात मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, कल्याण, अलिबाग, ठाणे येथील व्यावसायिक आणि स्थानिक रहिवासी हे करंजा बंदरात येऊ लागले आहेत.
उरण तालुक्यातील किनारपट्टीवरील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरांत मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे. यामध्ये, सुमारे 700 पेक्षा अधिक मासेमारी बोटी असून मासळीची खरेदी- विक्री करण्यासाठी त्यांना मुंबईतील ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथे जावे लागत होते. सरकारच्या माध्यमातून 600 मीटर लांबीचे ह्यफिशिंग-डॉकह्ण करंजा येथे उभारण्यात आले आहे. यामध्ये, मासेमारी बोटीतील मासळी बंदरात उतरवून त्याच्या खरेदी-विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे. याचा फायदा उरणसह जिल्ह्यातील मच्छीमारांना होऊ लागला आहे.या सुविधा आणखी वाढत राहिल्यास मत्स्य व्यवसाय वाढीला लागणार आहे.
उरणच्या करंजा व मोरा येथील शेकडो मच्छीमार बोटी अनेक वर्षे मुंबईतील ससून बंदरात मासळी विक्री करीत होते. मात्र सध्या या बोटी नव्या करंजा बंदरात मासळीचा व्यापार करीत आहेत. त्यामुळे ससून बंदराच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
जिल्हा मत्स्य विभागाने 1 हजार 400 बोटींना डिझेल कोटा मिळावा म्हणून प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच डिझेल कोट्याची ही मागणी केली आहे.
संजय पाटील, सहआयुक्त, जिल्हा मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड
मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला आहे. मात्र सर्व मच्छीमारांना डिझेल कोटा मिळालेला नाही. काही बोटींना मिळालेला आहे.
प्रदीप नाखवा, अध्यक्ष, करंजा मच्छीमार सहकारी संस्था, उरण