पोलादपूर : तालुक्यातील लोहारमाळ येथील फिर्यादीचा एडीट केलेला फोटो दाखवत आरोपी यांनी दमदाटी करत शारीरिक अत्याचार केले. या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत 1 ऑक्टोबर 2022 ते 21 सप्टेंबर 2024 रोजी या दीड वर्षांच्या काळात दरम्यान ही घटना घडली आहे. आरोपीत रा. लोहारमाळ, ता पोलादपूर यांनी फिर्यादी यांचा एडीट केलेला अश्लील फोटो त्यांना दाखविला. फिर्यादी यांनी घरातुन निघुन जाण्याची विनंती केली असता त्यांनी धक्काबुकी दमदाटी करून फिर्यादी या अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा आरोपीत यांनी तिचे मनाविरूध्द शारीरिक संबंध ठेवले.
तसेच फिर्यादी यांनी विरोध केला असता फिर्यादी यांना मारहाण करून धमकी देवून वेळोवेळी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे येथे पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि माने हे करीत आहेत.