नेरळ : आनंद सकपाळ
नेरळ ग्रामपंचाय हद्दीतील माथेरान डोंगराच्या पायथ्याशी वसलेलया आनंदवाडी, आंबेवाडी, कोबंळवाडी व नवीवाडी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची आवस्था ही खड्डेमय परस्थितीत असल्याने या भागातील आदिवासी बांधवासह या भागातील मोठ्या प्रमाणात चाळींचे बांधण्यात आलेल्या चाळकत्यांना या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेल्या खड्डेमय रस्त्यावरून आपला जीव मुठीत घेऊन खडतर प्रवास करावा लागत आहे.
या खडतर प्रवासामुळे मान व कमरेच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र या कडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, नागरिकांच्या या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कर्जत कल्याण राज्य मार्गाला मोहाची वाडी ते आनंदवाडी असा जोडणारा अंदाजे एक ते सव्हा कि, मीटरचा जोड रस्ता आहे. तर या जोड रस्त्याचे काम हे या आधी शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्त्याची दूरअवस्था झाल्याने नव्याने कर्जत कल्याण राज्यमार्ग ते मोहाचीवाडी साई मंदिरच्या पुढपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता बजेट ०.४ मधुन तर पुढील रस्ता हा मिनाताई पवार यांच्या घरापर्यंतचा सिमेंट काँक्रीट रस्ता हा ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण ३०५४ मधून करण्यात आला आहे.
मात्र या पुढे आनंदवाडी, आंबेवाडी, कोबंळवाडी व नवीवाडीकडे जाणारा रस्ता मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजन तून डांबरीकरण झाल्या नंतर आज मितीला खड्डेमय परस्थितीमध्ये आहे. या वाडयांवस्त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळींचे व बंगल्यांची बांधकाम झाले आसल्याने, व मोठ्या प्रमाणा नागरिकरण वाढले असल्याने, या खड्डेमय रस्त्यावरून या चार आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवानासह इतर नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन खडतर प्रवास करावा लागत आहे.
या खडतर प्रवासामुळे काही नागरिकांना मान व कमरेच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेत नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांनी स्वखर्चातून खडी व माती टाकून सदर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. एकीकडे नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे यांची नागरिकान प्रति आपुलकी तर पावसामुळे पुन्हा खड्डेमय झालेल्या रस्त्यावरील नागरिकांच्या खडतर प्रवासाकडे मात्र प्रशासनाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष पहाता, नागरिकांच्या या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हा रस्ता बऱ्याच वर्षापूर्वी आनंदावाडी रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबराचा बनवण्यात आला होता. तर मोहाचीवाडी पर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता प्रशासनाकडून बनवण्यात आला आहे. मग आम्ही आदिवासी समजाचे असल्यामुळे मायबाप शासन प्रशासन आमच्या खड्डेमय रस्त्यावरील खडतर प्रवासाकडे दुर्लक्ष करीत आहेत का?
कविता शिंगवा, आदिवासी सामाजिक माहिला कार्यकर्ते