Murud tourism : मुरुडच्या ताज्या माडीची लज्जतच लयभारी

दिवाळीत आलेल्या हजारो पर्यटकांची पहिली पसंती
Murud tourism
मुरुडच्या ताज्या माडीची लज्जतच लयभारी pudhari photo
Published on
Updated on

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

मुरुड म्हटले की निळाशार समुद्र, त्या समिंदरातील ताजी फडफडणारी मासळी.. त्या मासळीचे लज्जतदार कालवण, सोबतीला तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी, मोकळा भात, गरमागरम रस्सा, सुकटीचं कालवण, कांदा, लिंबू अस काठोकाठ भरलेलं ताट समोर आलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही.

या चमचमित सामिष भोजनासह शरीराला थंडावा मिळावा म्हणून प्राशन केलेले नारळाचे पाणी अथवा माडावरून काढलेली ताजी माडी...हे सारं आठवलं की आपोआपच मन प्रसन्न होते.असाच सुखद अनुभव दिवाळीत आलेल्या हजारो पर्यटकांनी यावेळी घेतला.विशेष करुन ताज्या माडीची चव चाखताना सारेजण कमालीचे खूष झाल्याचे दिसून आले.पर्यटकांच्या जिभेची लज्जत वाढविणारी ही माडी साऱ्यांच्या पसंतीला पडल्याचे जाणवू लागले आहे.हा व्यवसाय वाढण्यासाठी सरकारच्या पाठबळाची गरज माडी व्यावसायिकांना वाटू लागलेली आहे.

Murud tourism
Bribery case : मुद्रांक जिल्हा अधिकारी कार्यालयातील लाचखोर लिपिक अटकेत

कोकणातील नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात . त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बऱ्या लोकांची नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणाऱ्या इतर उत्पन्नांवर उपजीविका चालते.

नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक पेय निघते ते म्हणजे माडी. मुरुडला पर्यटकांसमोर नारळाच्या झाडावर चढून ताजी माडी काढून देण्याची प्रथा असल्याने मुरुडला खास गॉड ताजी माडी पिण्यासाठी येतात .परंतु मागील 3 वर्षात झालेल्या वादळात रायगडात हजारो नारळाची झाडे पडली .

Murud tourism
Thane internal metro : ठाण्याची अंतर्गत मेट्रो 2029 ला सुरु करण्याचे नियोजन

त्यामुळे माडी पडणारे हताश झाले .इतर व्यवसाय करू लागले त्यामुळे मांडीचे उत्पादन कमी झाले या व्यवसायाला शासनाकडून आर्थिक मदत देऊन माडी देण्याचे परवाने देण्याची गरज आहे. सगळ्याच हॉटेल्स्‌‍, रेस्टहाऊस, कॉटेज आदी भोवती अगदी उंच उ ऐटदार नारळाची झाडे मिरवत आहेत. त्यांची माडी काढतात हे माहीत होते पण प्रत्यक्ष पाहण्याचा योग पर्यटकांना येत असल्याने मुरुडची माडी प्रसिद्ध आहे.

माडीसाठी लागणारे साहित्य

कोयता -चांगला धारदार असतो. मडके - हे वर टांगण्यासाठी मातीचेच असते. सांबर शिंग किंवा मजबूत काठी - सांबार प्राण्याची शिंग भरपुर टणक असते. काटेसावरीचा कोंब - काटेसावरीच्या झाडाचा कोवळया फांदीचा सोललेला कोंब. हा खाताही येतो. त्याने मला त्यातील थोडा तुकडा खायलाही दिला. तशी काही विशेष चव नसते. पण ह्याला चिकटपणा असतो.दोरी - पोय गुंडाळण्यासाठी कळशी - माडी उतरवण्यासाठी अशे साहित्य सोयाबीत घेऊन पर्यटकांसमोर ऊच माडावरून माडी काढताना पाहण्याची मजा काही वेगळीत आहे.

माडीने नशा चढत नाही

माडीबद्दल असा समज आहे की माडीने नशा चढते. पण ही समज चुकीची आहे. शुद्ध माडीने कधीच नशा चढत नाही उलट ती शित गुणाची असल्याने आरोग्यदायी असते. माडीला काही धंदेवाईक लोक नशा आणतात. त्यात चुना तसेच इतर नशेचे पदार्थ टाकून तिला मादक बनवतात. शुद्ध माडी मात्र गोड, साधारण ताडगोळ्याच्या पाण्यासारखी व आंबूस लागते. जर ही माडी अजुन 4-5 तास ठेवली तर मात्र त्याला गॅस चढायला सुरुवात होते. म्हणून झाडावरून काढल्यावर लगेच प्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news