Mumbai-Goa National Highway | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे 40 % काम अपूर्णच

रायगडातील कासू ते इंदापूरदरम्यानच्या कामाची रखडपट्टी
Mumbai-Goa National Highway
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे 40 % काम अपूर्णचpudhari photo
Published on
Updated on

रायगड : गेली तेरा वर्षे रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. रायगड जिल्हयातील एकूण कामापैकी 40 टक्के अद्यापही अपूर्णच आहे. पनवेल ते इंदापूर हे 84 किमीचे अंतर दोन पॅकेजपैकी पनवेल ते कासू हे 42 किमीचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे आणि कासू ते इंदापूर हे उरलेले 42 किमीचे काम सुरु आहे. या पॅकेजमधील जमीनीवरचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. दोन पॅकेजचे 84 किमीपैकी सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. येत्या डिसेंबरपर्यंत रायगड जिल्हयातील महामार्गाचे काम पूर्ण होईल असे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांनी म्हटले आहे.

मुंबई कोकण आणि गोवा दरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 12 वर्षांपूर्वी 555 किलोमीटरचा मुंबई ते गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले की पनवेल ते कासू 42 किमीच्या टप्प्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले होते. या महामार्गाचे काम 44 हजार कोटी रुपयांतून सुरु आहे. संपूर्ण योजनेचे काम दहा पॅकेजमध्ये सुरु होते. त्यातील सहा पॅकेज पूर्ण झाले. पॅकेज तीनचे काम शिल्लक आहे. बोगदयाची कामेही पूर्णत्वाकडे आहेत. याच बरोबर पॅकेज क्रमांक 1 चे काही जुजबी कामे शिल्लक आहे ती डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होतील अशी माहीती या अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहे.

Mumbai-Goa National Highway
मासेमारीसाठी गेलेली बोट बाणावली येथे उलटली

सध्या पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मान्सूनपूर्व कामे सुरूआहेत असे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. राज्यातला सर्वात मोठा मुंबईत ते नागपूर 700 किमीचा समृद्धी महामार्ग पूरा होत आला तरी मुंबई ते गोवा महामार्गाचे भिजत घोंगडे कायम असल्याने अनेकदा यावर विरोधी पक्षांसह समाजाच्या विविधस्तरातून टीका होत आहे.

सध्या रायगड जिल्हयातील पनवेल ते इंदापूर हे 84 किमीचे अंतर दोन पॅकेजपैकी पनवेल ते कासू हे 42 किमीचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे आणि कासू ते इंदापूर हे उरलेले 42 किमीचे काम सुरु आहे. या पॅकेजमधील जमिनीवरचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील दोन पॅकेजचे 84 किमीपैकी सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. येत्या डिसेंबरपर्यंत रायगड जिल्हयातील महामार्गाचे काम पूर्ण होईल असे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांनी यापूर्वीच म्हटलेले आहे. याबाबत महामार्ग अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Mumbai-Goa National Highway
'लाडकी बहिण' याेजनेला अर्थ खात्‍याचा विरोध? अजित पवारांनी केला मोठा खुलासा

गणेशोत्सवात खरडपट्टी होणार

मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका गेल्यावर्षी गणपती महोत्सवासाठी खुली करण्यात आली होती. यंदा गणपती 7 सप्टेंबर रोजी आहेत. त्यामुळे यंदाही कोकणात गणपतीच्या सणासाठी जाणार्‍या चाकरमान्यांचा मुंबई - गोवा महामार्गावरील प्रवास अत्यंत खडतर राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री करणार पाहणी

महामार्गाचे अद्याप पूर्ण झालेले नाही. येत्या गणेशोत्सवात पुन्हा एकदा कोकणवासियांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार असलयाने मंत्री, लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामावरून राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दहा ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करणार असल्याचे समजते.यावेळी ते कोणते आश्वासन देतात याकडे रायगडवासियांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news