Matoshree Navanna Toran | मातोश्रीवर चौलचे नवान्न तोरण बांधण्याची ३० वर्षांची काय आहे परंपरा? बाळासाहेब ठाकरेंनी केले होते कौतुक

राकेश काढे यांची अनोखी कला
Matoshree Navanna toran
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नवान्न तोरण देताना शिवसैनिक(Pudhari Photo)
Published on
Updated on

Uddhav Thackeray Matoshree Navanna toran

रायगड : निसर्गाशी असलेले अतूट नाते सांगणारी  आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराला नवान्न पौर्णिमेच्या दिवशी बांधण्याची नवान्न तोरणाची गेल्या ३० वर्षांची परंपरा यंदाही अखंडपणे जपण्यात आली आहे. चौल येथील कलाकार राकेश काढे हे शिवसैनिक हे तोरण तयार करतात. आणि शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान असलेल्या ‘मातोश्री’वर नवान्न पौर्णिमेच्या दिवशी ते बांधण्यात येते.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुखावणारे तोरण असे. त्यासाठी त्यांनी काठे यांना शाब्बासकी दिली होती. कोकणातील कृषिसंस्कृती, भक्तिभाव आणि शिवसेनेच्या संघटित संस्कारांचा सुंदर संगम असलेला हा सोहळा मातोश्रीवर दरवर्षीप्रमाणेच यंदाही उत्साहात पार पडला.

Matoshree Navanna toran
Raigad ZP recruitment : रायगड जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या पुढाकाराने मातोश्रीवर हे ‘नवान्न तोरण’ बांधण्याची परंपरा अखंड सुरु आहे. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नवीन अन्नधान्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी हा शुभ सोहळा दरवर्षी पार पडतो.

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने नवअन्न तोरण बांधण्यात आले. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी “बळीराजा सुखी होऊ दे, आपल्या मातीत पुन्हा भरभराट नांदो, आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात समृद्धीचे दिवे कायम पेटत राहू देत,” अशा भावपूर्ण शुभेच्छा दिल्या. ठाकरे यांच्या या संदेशाने उपस्थितांमध्ये उत्साह आणि भावनिक ऊर्जेची लहर पसरली.

Matoshree Navanna toran
Raigad Ropeway: रायगड रोपवेवर थरारक प्रात्यक्षिक; पहा व्हिडिओ

नवान्न पौर्णिमा म्हणजे नवीन धान्याची पौर्णिमा — कोकणातील शेतकरी वर्ग या दिवशी निसर्गमातेचे आभार मानत नवीन पीक घरात आणतो. दसऱ्याच्या सुमारास सर्व धान्य घरात आल्यावर, दिवाळीपूर्वी आठ दिवस आधी साजरा होणारा हा उत्सव समृद्धीचे प्रतीक मानला जातो. घराघरात ‘नवे’ म्हणजे धान्याचे भारे बांधले जातात, दारात रांगोळ्या आणि दिव्यांची सजावट केली जाते, आणि धान्यलक्ष्मीचे स्वागत उत्साहात केले जाते.

या सोहळ्यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल विभागप्रमुख मारुती भगत, पेण उपतालुका प्रमुख चेतन मोकल, तसेच उपकार खोत, राजू शेणवेकर, सुनील घरत, राजेश काठे, बाळू वर्तक, अल्पेश ठाकूर यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Matoshree Navanna toran
Raigad Fort landslides : किल्ले रायगड पायरी मार्गावरील दगड पडण्याचे प्रकार सुरूच

मातोश्रीवरील हा पारंपरिक सोहळा केवळ निसर्गपूजन नव्हे, तर शिवसैनिकांच्या श्रद्धा, निष्ठा आणि संस्कारांचा जीवंत आविष्कार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मातोश्रीच्या प्रांगणात नवअन्नाचा सुगंध, भक्तिभावाची झलक आणि शिवसेनेचा अभिमान एकवटला — “मातोश्री” ही फक्त वास्तू नसून, ती परंपरेचा, संस्कारांचा आणि जनभावनेचा पवित्र केंद्रबिंदू आहे, हे पुन्हा एकदा या सोहळ्याने अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news