1850 साली ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावला व त्यानंतर हळूहळू मात्रांमध्ये पर्यटन वाढीस लागावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. 1965 साली पनवेल येथून धोदानी मार्गे माथेरान करिता नवीन रस्ता शासनाने मंजूर केला व त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते हा रस्ता धोधानी गावापर्यंत पूर्ण करण्यात आला परंतु त्यानंतर काही चक्रे फिरली व पुढील रस्ता अर्धवट सोडून हा प्रकल्प बंद करण्यात आला असे का करण्यात आले याचे कोणतेही उत्तर स्थानिकांना अजूनही मिळालेले नाही परंतु काही पर्यावरणवादी, स्थानिक व्यापारी यांच्या व्यापारावर हा मार्ग सुरू झाल्याने विपरीत परिणाम होणार होता व माथेरान मधील काही बंगले धारक यामध्ये सामील असावे असे आजही माथेरान मध्ये बोलले जाते परंतु हा रस्ता रद्द झाल्याने माथेरानचे अपरिमित नुकसान झाले असून एकमेव रस्ता असल्याने अनेक जण आज या रस्त्यावर आंदोलन करून माथेरानकरांना वेठीस धरण्याचे काम करत आहे त्याचप्रमाणे हा एकमेव रस्ता असल्याने पर्यटकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये या घाटामध्ये नेहमीच वाहनांचे कोंडी होत असून त्याचा थेट परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होत आहे या कोंडीमध्ये अडकलेला पर्यटन पुन्हा माथेरानचे नावे घेत नसल्याचे अनेकांना त्याचा प्रत्यय आला आहे.
मागील काही काळामध्ये माथेरानच्या आजूबाजूला असलेल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस संस्कृती फोफावू लागली असून थेट गाडी येथे जात असल्याने माथेरानच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारची जाहिरात करून ही फार्म हाऊस वीकेंडला नेहमीच फुल असल्याचे पहावयास मिळत आहे पण यावेळी माथेरान मध्ये मात्र पर्यटकांची संख्या कमी झालेली पाहावयास मिळत असते. कर्जत शहराला फार्म हाऊस तालुका म्हणून नवीन ओळख सध्या मिळत असून त्याचे थेट परिणाम माथेरानच्या पर्यटनावर होत आहे. वाहतूक व्यवस्थेमधील मर्यादित व्यवस्था, त्याचप्रमाणे मोठे शहरांशी जवळीक निर्माण होईल असे रस्ते नसल्यामुळे माथेरान पारंपारिक पर्यटनामुळे मागे पडत चालल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे त्यामुळेच माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळण्याकरिता माथेरानला पर्यायी रस्ता हवाच अशी भूमिका येथील स्थानिकांची झाली असून वारंवार मागणी करूनही त्यास शासन स्तरावरती अजिबात प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शासन सुद्धा माथेरानच्या या मागणीला उदासीन आहे का असा प्रश्न सध्या माथेरानमधील नागरिकांना पडला आहे. आधुनिकीकरणाच्या जगतामध्ये निभाव लागण्या करीता येथील वाहतूक व्यवस्थांमध्ये बदल होणे ही काळाची गरज आहे.
1850 साली ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावला व त्यानंतर हळूहळू मात्रांमध्ये पर्यटन वाढीस लागावे यासाठी प्रयत्न सुरू झाले व त्यानुसार नेरळ येथून माथेरान करतात कच्चा रस्ता बनविण्यात आला जो अनेक वर्ष माथेरानमध्ये पर्यटकांना घेऊन जात होता. परंतु 1972 च्यानंतर माथेरानमध्ये स्थानिक नागरिकांनी श्रमदान करून या रस्ता चालण्यायोग्य व वाहने येऊ शकतील असा तयार केल्याने खर्या अर्थाने माथेरानच्या पर्यटनास भरभराट सुरू झाली. या रस्त्यामुळे माथेरानच नाहीतर माथेरानच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी वाड्या व नेरळ या गावचा विकास झालेला पहावयास मिळाला.