Raigad news: महाड मनसे शहराध्यक्ष मारहाण प्रकरणी माजी सभापतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Mahad MNS Chief: मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा राग धरून हल्ला केल्याचा आरोप
Raigad news
Raigad news
Published on
Updated on

महाड: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे मारहाण प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसेचे वरिष्ठ नेते आज (दि.२ नोव्हेंबर) महाडमध्ये दाखल होत असल्याने याप्रकरणी महाडमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राजकीय टीका टिपणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी सोशल मीडियावर रोजगार हमी उत्पादन मंत्री गोगावले यांच्यावर वैयक्तिक टीका टिपणी केली होती.

या गोष्टीचा राग मनामध्ये धरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह सात जणांनी पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांच्या चवदार तळे येथील पंकज प्रेम मास्टर व फोटो स्टुडिओ या दुकानात येऊन पंकज उमासरे यांना लाथा बुक्क्यांनी व हाताच्या ठोशाने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.१ नोव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मारहाणीचे वृत्त समजल्यानंतर पोलिसांनी पंकज उमासरे यांना प्रथम महाग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर एमआरआय करण्यासाठी माणगाव रुग्णालय येथे नेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह रोहन धेडवाल, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सौजन्य कानेकर ,भावड्या सुर्वे, निरज खेडेकर, सुनंदा पवार यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७(२), १८९(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे तपास करीत आहेत.

या मारहाणी प्रकरणी 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता गुन्हा घडल्यानंतर २ नोव्हेंबर पहाटे ४.३८ वाजता महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महाड मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news