खाडीपट्टा : खाडीपट्टयातील जनावरांना लागण झालेल्या लंपी रोगाला आळा घालण्यासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी पुढे सरसावले आहेत. यासाठी पशुधन दवाखान्यातील कर्मचार्यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबतचे वृत्त दै.पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल पशूधन विभागाने घेतली आहे.
तेलंगे येथे महाराष्ट्र शासनाचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र हा दवाखाना गेली कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आढळूण येत आहे. कधी डॉक्टर जागेवर नाहीत, तर कधी दवाखान्याला कुलूप अशी काहीशी गंभीर अवस्था आहे. त्यामुळे तेलंगे, ओवळे गावासह नजीकच्या गावातील पशुपालकांचे हाल झाले आहे. सदर दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घेऊन संबंधित कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत तसेच तात्काळ पशुसंवर्धन विभाग स्वतः अधिकारी यांनी प्रत्यक्ष लंपी आजाराची लक्षण असलेल्या बैलाची पाहणी करून औषधोपचार केले आहेत. त्यामुळे दैनिक पुढारीचे स्थानिक शेतकर्यांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
तेलंगे येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगे पशुसंवर्धन अधिकारी म्हणून डॉ. गोयल यांची नेमणूक केलेली, परंतु दुर्दैवाने संबंधित अधिकारी आजही ग्रामस्थांच्या संपर्कात नाहीत. नेमके कुठे राहून काम करतात याबाबत ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली होती. या संदर्भात तेथील नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता संबंधित अधिकार्यांची नेमणूक तेलंगे येथे केलेली आहे असे कळले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याच विषयावसंदर्भात दैनिक पुढारी ने बातमी प्रसिद्ध करताच वरिष्ठ अधिकार्यांनी दाखल घेत संबंधित कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेततेलंगे गावामध्ये गुरांना लंपि या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे असे असताना पशुवैद्यकिय अधिकारी उपस्थित नसणे याचा अर्थ मुक्या जनावरांचा बळी घेणे यासाठी यांची नेमणूक केली आहे का असा ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे.