

खोपोली : आगामी जिल्हा परिषद पंचयत समिती सह नगरपालिकेचे निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता असल्याने आरक्षण सोडती नंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवार भेटीगाठी सह पक्षश्रेष्टी ची मनधारणी करण्यास बैठका ही सुरू झाल्या आहेत. तसेच आपल्या मर्जीतील पक्ष नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी नवनियुक्त्या यासह वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असली तरी इच्छुक उमेदवार कामाला लागण्याचे चित्र आहे.
खालापूर तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचयत समितीच्या निवडणुका चे आरक्षण जाहीर झाले असून अनेकांची दांडी गुल झाली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने खालापूर तालुक्यातील प्रत्येक प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे.
मागील निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचयत समिती ची .मागील राजकीय परिस्थिती जिल्हा परिषद मतदार संघात चार पैकी तीन राष्ट्रवादी तर एक शिवसेना पंचयत समिती राष्ट्रवादी काँग्रेस 2 , तर शिवसेना तीन , शेकाप कडे दोन तसेच आय काँग्रेस एक संख्याबळ होते शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फुटी नंतर आता आगामी होणाऱ्या निवडणुकीत कोणाला मतदारांची साथ मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत.
कर्जत - खालापूर मतदार संघात महाविकास आघाडी व महायुती असे दोन गट पडले असले तरी दोन्ही बाजूने आघाड्या ची बिघाडी होणार असल्याचे चित्र असून कर्जत खालापुरात तर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट महाविकास आघाडी मध्ये असताना आमने सामने कट्टर विरोधी भूमिके मध्ये आहेत . मात्र शिवसेना ठाकरे गट ,भाजपा ,शेकाप,व आय काँग्रेस ,आर पी आय मनसे मात्र तटस्थ भूमिकेत आहेत.
त्यामुळे खालापूर तालुक्यात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेना काही झाले तरी विरोधी भूमिकेतूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे यात कोणताही बदल दिसत नाही. मात्र या दोघांच्या भांडणात ठाकरे गटाची शिवसेना या दोघांच्या भांडणाचा लाभ घेते का याकडे ही पाहणे गरचेचे आहे. मित्र पक्ष असणारे भाजपा व आर पी आय शेकाप , आय काँग्रेस ,मनसे काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत. खालापूर तालुक्यात प्रमुख भूमिके मध्ये असणारे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची ग्रामीण भागात परिस्थिती दोन्ही बाजूने तुल्यबळ आहे.
तालुक्याचे असे आहे आरक्षण
नुकताच आरक्षण सोडती नंतर 4 जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झाले चौक - अनुसूचित जमाती महिला ,वासांबे - सर्वसाधारण ,सावरोली - सर्वसाधारण आत्करगांव - सर्वसाधारण महिला तर खालापूर पंचायत समिती वार्ड 8 जागांचे आरक्षण जाहीर झाल्यानुसार चौक - अनु.जमाती स्त्री , हाळ खुर्द - अनु.जमाती, वासांबे - इतर मागासवर्गीय , रिस - सर्वसाधारण , वाशिवली - ना.मा.प्रवर्ग (स्त्री), सावरोली - सर्वसाधारण स्त्री , खानाव - सर्वसाधारण , आत्करगाव - सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण जाहीर झाले आहेत.अनेक दिग्गजांची दांडी आरक्षणाने उडाली आहे.
आरक्षणाने अनेकांची दांडी गुल
खालापूर तालुक्यातील शिवसेना व राष्ट्रवादी च्या फुटी नंतर राजकारण बदलले असून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय झालेले नरेश पाटील यांनी भाजपात गेले तर शिवसेनेच्या तिकिटावर विजय झालेले मोतीराम ठोबरे यांनी सुद्धा भाजपाचा मार्ग स्वीकारला मात्र दोघांच्या प्रभागात त्यांच्या सोयीचे आरक्षण जाहीर झाल्याने दोघांना पर्यायाचा आधार घ्यावा लागेल .
नव्याने पंचायत समिती साठी जोरदार तयारी करणारे राष्ट्रवादी गौरव दिसले व त्यांच्या पत्नी मोनिका गौरव दिसले यांच्या प्रभागात अनुसूचित जमाती चे आरक्षण पडल्याने पती पत्नीचा भ्रमनिरास झाला आहे तर माजी सभापती पद भूषविलेल्या श्रद्धा अंकित साखरे महिला आरक्षणामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार असल्याचे चित्र आहे .इच्छुकांची गर्दी वाढली आहे.