

Raigad Mahad Bhadesar Saree Center fire
महाड : शहरातील जुना पोस्ट परिसरात असलेल्या भदेसर साडी सेंटरला शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
दिवाळीनिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने अथवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात अधिक तपशील रात्री उशिरा प्राप्त होऊ शकला नाही. त्यामुळे आगीचे निश्चित कारण काय आहे, हे तपसात स्पष्ट होईल.