पनवेलमध्ये १९ लाखांच्या सोने चोरीचा ७२ तासात छडा | पुढारी

पनवेलमध्ये १९ लाखांच्या सोने चोरीचा ७२ तासात छडा

रायगड; पुढारी वृत्तसेवा

कळंबोली मॅकडोनाल्ड समोर असणाऱ्या बस स्टॉपजवळ बीड-आंबेजोगाई वरून सोने खरेदीसाठी आलेल्या सोने व्यापाऱ्याच्या डोळ्यात अज्ञातांनी मिरची पूड टाकून 19 लाख रुपयांची लूट केली होती. ही घटना कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी गु.र.न. 461/2021 भा.द. वि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या घटनेची दखल घेवून पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली असता, आरोपी कसे आणि कोणत्या दिशेने पळून गेले याचा सखोल चौकशीअंती माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सोने व्यापाऱ्यावर दरोडा टाकणाऱ्या 6 आरोपींना अवघ्या 72 तासांत अटक केली. सुरुवातीला या घटनेची नोंद चोरी म्हणून करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान तो दरोडा असल्याचे निष्पन्न झाले.

या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून काही मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 3 घातक शस्त्रे, रक्कम ठेवलेली बॅग, गुन्ह्यात वापरलेली 2 वाहने, लुटलेली रक्कम अशा एकूण 22 लाख 54 हजार रूपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस अप्पर आयुक्त यांच्या आदेशाने, गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, पो.ना.अजिनाथ फूदे, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, अनिल पाटील, तुकाराम सुर्यवशी, रणजित पाटील, सचिन पवार यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

व्हिडिओ पहा – हिमाचल प्रदेशमधलं मिनी थायलंड | Himachal pradesh Travel vlog- 3

Back to top button