विन्हेरे; विराज पाटील : महाड तालुक्यातील विन्हेरे गावात एसटी बस चालकाने भर पाण्यातून ५२ प्रवाशांसह पुलावरून नेली. दरम्यान एसटी बस चालकाच्या या अती धाडसाबद्दल नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागच्या दोन दिवसांपासून महाडसह ग्रामीण भागांत मुसळधार पावसाने छोटे, मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पिंपरी चिंचवडकडून मार्गस्थ झालेली वेळास या गावात जाणाऱ्या एसटी चालकाने याबाबत खुलासा ही केला आहे.
अधिक वाचा :
मागच्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्यातील काही मार्ग स्थानिक नागरिक प्रवासी व वाहनांसाठी बंद केले आहेत.
महामंडळाच्या पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या एसटी बसचा चालक विजयकुमार रामचंद्र जाधव (ब. क्र १०२७) काल (दि.१२) याने दुपारी चारच्या सुमारास रेवतळे पुल बुडालेल्या अवस्थेत असताना ५२ प्रवाशांसह बस नेल्याचा प्रकार सोशल मिडीयावरून उघड झाला.
याबाबत चालकाला मंडणगड स्थानकात उतरविण्यात आल्याची माहिती महाड आगार प्रभारी शिवाजी जाधव यांनी दिली.
अधिक वाचा :
या संदर्भात महाड एसटी आगारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ३.१५ वाजता पिंपरी चिंचवडहून महाड आगारात बस आली व येथून वेळासच्या दिशेने रवाना झाली.
सुमारे पावणे चारच्या सुमारास ही बस रेवतळे पुलावरून नेल्याचा व्हिडिओ स्थानिक ग्रामस्थांकडून व्हायरल करण्यात आला.
एसटी महामंडळातील माहितीनुसार मंडणगड विभागात चालकाचा जबाब घेण्यात आला.
अधिक वाचा :
या जबाबामध्ये चालक विजयकुमार जाधव यांनी आपल्याला पुलावरील गार्ड स्टोन दिसत असल्याने हे धाडस केल्याचे सांगितले.
यामुळे ५२ प्रवाशांसह बस पुलावरून मंडणगडच्या दिशेने नेल्याचे सांगितले.
महाड तालुक्यातील पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असते.
यातच हा प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण हा सवाल नागरीकांतून व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात असलेल्या कायदेशीर निर्देशांचे पालन चालक वाहकांनी करावे याबाबत कडक आदेश द्यावेत अशी मागणी केली जात आहे .
हे ही वाचा :
हे ही पाहा :
कोल्हापूरचे सुरमयी पर्व: उस्ताद अल्लदियाँ खाँसाहेब