रायगड : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना बसला कोकण रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाचा फटका! | पुढारी

रायगड : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना बसला कोकण रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाचा फटका!

महाड; पुढारी वृत्‍तसेवा कोकण रेल्वेच्या दिवानखवटी परिसरात ओव्हर हेड लाईनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बसला. या संदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता, त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला.

पहाटे अडीच ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या वेळेत विद्युत प्रवाहामध्ये बिघाड झाल्याने गाड्या उशिराने धावत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या नियोजित रत्नागिरी जिल्हा दौऱ्यासाठी या कोकण कन्या रेल्वेतून प्रवास करीत होते. त्यांच्यासमवेत अन्य काही मंत्री होते कि नाही याबाबतचा तपशील प्राप्त झालेला नाही. या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. यानंतर कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गावरील प्रवासी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे रेल्वे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

हेही वाचा :  

Back to top button