जलसमाधी आंदोलन : रविकांत तुपकर यांच्यासह शेतकरी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

जलसमाधी आंदोलन : रविकांत तुपकर यांच्यासह शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी मागण्या मान्य झाल्या नाही तर, अरबी समुद्रात समाधी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जलसमाधीला निघालेल्या आमदार रविकांत तुपकर यांच्यासह असंख्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार रविकांत तुपकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांसोबत रविकांत तुपकर यांच्या पत्नी ही आहेत.

यानंतर आमदार रविकांत तुपकर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरविण्यात येईल.
अॅड. शर्वरी रविकांत तुपकर (कार्यकर्त्या)

हेही वाचलंत का? 

Back to top button