Narayan Rane : नारायण राणे आज रायगड पोलिसांसमोर हजर राहणार | पुढारी

Narayan Rane : नारायण राणे आज रायगड पोलिसांसमोर हजर राहणार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आज अलिबागमधील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांनी अटक झाली होती.

ज्या दिवशी नारायण राणे यांना अटक झाली होती त्याच दिवशीच रात्री महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यांना जामीन मंजूर करताना महिन्यातून दोनवेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती.

पण राणेंनी प्रकृतीचं कारण दिले होते. यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावली नव्हती. मात्र, आज सोमवारी राणे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत.

नारायण राणे (Narayan Rane) मुंबईतून अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते दुपारी एकपर्यंत अलिबागमध्ये दाखल होणार असल्याचे समजते.

राणे अलिबागमध्ये येत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर येथे अटक करुन महाड न्यालयात हजर केले होते. राणे यांना त्यावेळी जामीन मंजूर केला होता.

जामीन मंजूर करताना रायगडच्या गुन्हेशाखेमध्ये दोन दिवस हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती.

त्यांना पहिली हजेरी ३० ऑगस्ट रोजी लावावी लागणार होती. पण त्यांनी हजेरी लावली नव्हती. आता दुसरी हजेरी आज १३ सप्टेंबर रोजी लावावी लागणार आहे.

हे ही वाचा :

पहा माधुरी पवारचा हटके लूक…

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button