मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूरफाटा ब्रीजवर भीषण अपघात; १४ जखमी | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूरफाटा ब्रीजवर भीषण अपघात; १४ जखमी

रायगड : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामर्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर भीषण अपघात झाला. आज पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये अपघात झाला असून टेम्पो ट्रॅव्हलरमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एकूण २२ प्रवासी होते. कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला आहे.

टेम्पो ट्रॅव्हलर (MH 43 BP 0756) खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे जात होती. यावेळी पेण हमरापूर ब्रीजवरील बंद पडलेल्या कॉईल ट्रेलर (MH ४६ AR ००७४) ला मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे.

जखमींमध्ये चालक सागर दिलीप गुरव (वय ३१), प्रतिभा महेश देवळे (वय ३०), रंजना दीपक भुवड (वय २५), मीनल काशिनाथ देवळे (वय २५), काशिनाथ पांडुरंग देवळे (वय ५०), सुरेश सखाराम नाचरे (वय ४०), प्रवीण काशिनाथ नाचरे (वय ३४), मंगेश मधुकर देवळे (वय ४१), स्वप्निला काशिनाथ देवळे (वय ४७), संजना संजय पाटील (वय ३४), समृद्धी संजय पाटील (वय १४), दीपक गंगाराम भुवड (वय ३०), श्वेता सुनील भुवड (३५), संजना सुरेश नाचरे (३५) यांचा समावेश आहे.

सर्व अपघातग्रस्तांना कल्पेश ठाकूर यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Back to top button