रायगड : शिंदे गटाला शह देण्यासाठी खालापूर शिवसेनेत फेरबदल | पुढारी

रायगड : शिंदे गटाला शह देण्यासाठी खालापूर शिवसेनेत फेरबदल

खोपोली : प्रशांत गोपाळे सध्या शिवसेना पक्षात दोन गट पडल्याने या दोन्ही गटातील संघर्ष टोकापर्यंत गेला असून हा संघर्ष न्यायालयीन कोर्टात जाऊन ठेपला असल्याचे पाहायला मिळत आहे. या संघर्षामुळे शिवसैनिकांमध्ये उभी दरी पडली असल्याने काही शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बाजूने तर काही शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे.

या संघर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूने ठाम उभ्या राहणार्‍या शिवसैनिकांची पक्षाच्या विशिष्ट पदावर वर्णी लावत त्यांची शिवसेनेवर असलेली निष्ठेचे फळ देण्याचे काम सुरू असताच याच अनुषंगाने खालापूर तालुक्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेची भूमिका पोहचवणारे तसेच शिवसेनेची बांधणी मजबूत करणार्‍या तीन सेना नेत्यांची वरिष्ठ पदावर वर्णी लागली असून यामध्ये पनवेल – उरण – कर्जत विधानसभा सहसंपर्कप्रमुखपदी भाई शिंदे, कर्जत – खालापूर विधानसभा संपर्कप्रमुखपदी डॉ. सुनील पाटील तर खालापूर तालुकाप्रमुखपदी एकनाथ पिंगळेचीं निवड करण्यात आली आहे. या निवडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात असून हे नवनिर्वाचित पदाधिकारी कर्जत- खालापूर तालुक्यात शिंदे गटाला आगामी काळात शह देण्यासाठी प्रामुख्याची बजावणार आहेत.

उध्दव ठाकरेंच्या संघर्षाच्या काळात उध्दव ठाकरेंच्या पाठिशी ठाम राहणार्‍या शिवसैनिकांनी त्यांच्या निष्ठेने फळ मिळू लागले असता कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पाळेमुळे अधिक मजबूत व शिवसैनिकांना अधिक आक्रमक बनविण्यासाठी मेहनत घेणार्‍या पदाधिकारी वर्गाला त्यांच्या कामाची पोचपावती देण्यात आली आहे. यामध्ये पनवेल – उरण – कर्जत विधानसभा सहसंपर्कप्रमुखपदी भाई शिंदे, कर्जत – खालापूर विधानसभा संपर्कप्रमुखपदी डॉ.सुनील पाटील तर खालापूर तालुकाप्रमुखपदी एकनाथ पिंगळेचीं निवड करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • शिवसेनेतील उलथापालथीने संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, या राजकारणात उलथापालथीने काही शिवसैनिकांनी तीव्र शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्याने या काळात काही शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभे राहत शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे.

हेही  वाचा

Back to top button