रायगड जिल्ह्यातील २८ धरणापैकी २२ धरणे भरली | पुढारी

रायगड जिल्ह्यातील २८ धरणापैकी २२ धरणे भरली

रोहे; महादेव सरसंबे : रायगड जिल्ह्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला असून रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत असलेल्या २८ धरणात पैकी २२ धरणे १०० टक्के पुर्ण क्षमतेने भरले आहेत. या मधील २१ धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे.

रायगड जिल्ह्यातील अंबा, सावित्री, उल्हास, कुंडलिका, पातळगंगा, गाढीनदी सध्या भरुण वाहत आहेत. पाऊस असाच कायम राहिल्यास रायगड जिल्ह्यात मुबलक पाणी साठा उपलब्ध होईल. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरण क्षेत्रात सर्वात कमी पाणीसाठा ५४ टक्के असून जिल्ह्यात अद्याप ५ धरणात पाणीसाठा कमी आहे. तर महाड तालुक्यातील खिंडवाडी व उरण तालुक्यातील पुनाडे हे दोन धरणे लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने भरतील अशा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला असून जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाणीसाठा पहाता मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात ८० टक्के पाणीसाठा, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, सुधागड तालुक्यातील घोटवडे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, सुधागड तालुक्यातील कवेळे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ६९ टक्के पाणीसाठा, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली ५४ टक्के पाणीसाठा, म्हसळा तालुक्यातील पाभरे १०० टक्के पाणीसाठा, म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणात क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, महाड तालुक्यातील वरंध धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, महाड तालुक्यातील खिंडवाडी धरण क्षेत्रात ९९ टक्के पाणीसाठा, महाड तालुक्यातील कोथुर्डे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा,महाड तालुक्यातील खैरे धरण क्षेत्रात ८६ टक्के पाणीसाठा, कर्जत तालुक्यातील साळोख धरणात क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, अवसरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, खालापूर तालुक्यातील भिलावले धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी १०० टक्के पाणीसाठा, खालापूर तालुक्यातील डोणवत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, पनवेल तालुक्यातील बामणोली धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, पनवेल तालुक्यातील उसरण धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ९३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Back to top button