रायगड : फिलीपिन्सची बोट नवगावच्या खडकात अडकली; ५ जणांना वाचवण्यात यश (Video) | पुढारी

रायगड : फिलीपिन्सची बोट नवगावच्या खडकात अडकली; ५ जणांना वाचवण्यात यश (Video)

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : फिलीपिन्स येथील बोट अलिबाग तालुक्यातील नवगावच्या खडकात अडकली होती. या बोटीत पाच कर्मचारी होते. भारतीय तटरक्षक दलाचे जवान व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले. या सर्वांना सुखरूप मुंबईला नेण्यात आले आहे.

बोटीत पाच कर्मचारी होते. त्यांना भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचविले. या सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती ठिक असून, त्यांना मुंबईला नेण्यात आल्‍याची माहिती मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजीव पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button