महाडमधील पूरसदृश्यस्थिती ओसरली; सावित्री नदीची पातळी तीन पूर्णांक सत्तर मीटर वर | पुढारी

महाडमधील पूरसदृश्यस्थिती ओसरली; सावित्री नदीची पातळी तीन पूर्णांक सत्तर मीटर वर

महाड पुढारी वृत्तसेवा :

साेमवारी (४जूलै) सकाळपासून सुरू झालेल्या महाडमधील तुफानी पर्जन्यवृष्टीने शहरासह लगतच्या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण केली होती. रात्री उशिरापर्यंत सावित्री नदीची पातळी चार पूर्णांक सत्तर पर्यंत कायम होती. आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पातळी तीन पूर्णांक साठ एवढी खाली उतरली आहे. असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाळा आला तरी होईना नालेसफाई; वडगाव शेरीत ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार वारंवार

पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाडच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड आपले सहकारी तहसीलदार श्री सुरेश काशीद व नगरपालिका मुख्याधिकारी श्री रोडगे यांच्यासह पहाटे तीन वाजेपर्यंत नियंत्रण कक्षामध्ये थांबून परिस्थितीचे अवलोकन करीत होत्या. महाड शहरासह लगतच्या गावांमधून पाऊस जोरात पडत आहे .शासनाच्या पुढील निर्देशाप्रमाणे अजून दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा म्हणजेच ऑरेंज झोन असल्याचे जाहीर केले आहे .संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे तसेच शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button