रोहे : महादेव सरसंबे
रायगड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडल्याने रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २५ धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित तीन धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. रायगड जिल्ह्यातील २८ धरणक्षेत्रात सरासरी ९८.८५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या २४ धरणक्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणक्षेत्रात ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याच तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यात जून पासून आत्तापर्यंत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पाणीसाठा चांगला उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
२०२३ साली याच दिवशी रायगड पाटबंधारे विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ धरणे १०० टक्के भरली होती, तर ४ धरणे १०० टक्के भरली नव्हती. तर याच दिवशी गेल्यावर्षी ९७.०३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून, जिल्ह्यातील २८ धरणक्षेत्रातील पाणीसाठा पाहिल्यास मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, घोटवडे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, ढोकशेत धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कवेळे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, उन्हेरे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध, कुडकी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, रानीवली धरणक्षेत्रात ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, संदेरी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंद धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खिंडवाडी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कोर्थुडे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खैरे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलावले धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, डोणवत धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, बामणोली धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, उसरण धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.