रायगड : विजेच्या धक्‍क्‍याने कोल गावातील वृद्धाचा मृत्‍यू - पुढारी

रायगड : विजेच्या धक्‍क्‍याने कोल गावातील वृद्धाचा मृत्‍यू

रायगड; पुढारी वृत्‍तसेवा : दुरूस्तीच्या कामादरम्यान पोलवरून खाली आलेल्‍या विद्युत वाहिनीचा स्‍पर्श झाल्‍याने कोल गावातील दगडू धोंडगे (वय ६२) यांचा मृत्‍यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे वीज वाहिण्यांचे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे वीज वाहिण्यांच्या दुरूस्‍तीचे काम सुरू आहे. घराबाहेरील विजेच्या पोलवरून खाली आलेल्‍या विद्युतवाहिनीला स्‍पर्श झाल्‍याने वीजेचा तीव्र धक्का बसून दगडू यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या  घटनेची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षात देण्यात आल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले.

हेही वाचलं का ? 

Back to top button