महाड : मूक मोर्चा काढून अमोल मिटकरींविरोधात तक्रार दाखल | पुढारी

महाड : मूक मोर्चा काढून अमोल मिटकरींविरोधात तक्रार दाखल

महाड : पुढारी वृत्तसेवा : ब्राह्मण समाजाची आणि पर्यायाने हिंदू विवाह विधींची खिल्ली उडविणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज (दि. २३) सायंकाळी महाड शहरातील चवदार तळे येथील राम मंदिरापासून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ही तक्रार दिली.

यावेळी जातीचा सलोखा बिघडविणारे आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अमोल मिटकरी यांच्या विरूद्ध तक्रार दिली. तक्रारीबरोबरच पुरावा म्हणून मिटकरी यांच्या वक्तव्याची रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्हदेखील सादर करण्यात आला. दरम्यान, कायदेशीर बाबी तपासून या प्रकरणी कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे यांनी दिली.

हिंदू जनजागृती समितीतर्फे अभय करमरकर यांनी ही तक्रार दिली. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बिपीन म्हामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, ब्राह्मण सभा महाडचे अध्यक्ष श्रीकृष्ण बाळ, डॉ. अजेय जोगळेकर , अॅड. राजेश जोशी, अभय करमरकर अॅड. आदित्य भाटे, अॅड. सुमित जोशी, राजन जोशी, हिंदू जन जागृती समिती, पुरोहत संघाचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button