रायगड : महाडमधील होळी उत्सवात जळकी लाकडं, निखारे फेकण्याची परंपरा, पहा व्हिडिओ | पुढारी

रायगड : महाडमधील होळी उत्सवात जळकी लाकडं, निखारे फेकण्याची परंपरा, पहा व्हिडिओ

महाड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळ आळी येथे परंपरागत प्रथेप्रमाणे होळी (holi)  उत्सव साजरा केला जातो. होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देव-दानवांचं युद्ध खेळल जातं. ही अनोखी परंपरा महाड शहरातील गवळ आळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने सुरू आहे.

गवळ आळीमध्ये पारंपरीक पद्धतीने होळी (holi) लावली जाते. होळी दहन झाली की या ठिकाणी ग्रामस्थांमधील दोन गटात प्रतिकात्मक युद्ध खेळलं जातं. या युद्धात होळीतील जळकी लाकडं, निखारे फेकण्याची परंपरा आहे.

 

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button