Mahad Flood : महाडमध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टर्सने बचावकार्य - पुढारी

Mahad Flood : महाडमध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टर्सने बचावकार्य

महाड; पुढारी वृत्तसेवा :  Mahad Flood : गेल्या तिन दिवसांपासून महाड व पोलादपूर तालुक्यांत सुरु असलेला धुवाँधार पाऊस.. त्यातच गेल्या 24 तासांत महाडमध्ये झालेला 205 मिमी पाऊस..महाबळेश्‍वर येथे झालेला 530 मिमी विक्रमी पाऊस आणि त्याच वेळी समुद्रात असलेली भरती यामुळे सावित्री नदिच्या जलपातळीत अत्यंत वेगाने वाढ होऊन, संध्याकाळी सावित्रिच्या पूराने संपुर्ण महाड तालुक्यांस वेढले आहे. दरम्यान, चिपळूण शहरास देखील पूराने वेढले असून तेथे 5 हजार नागरिक पूरामध्ये अडकले आहेत.

महाडच्या लोकांशी ज्यांचा संपर्क होईल त्यांनी कृपया मेसेज द्यावा की, लोकांनी घराच्या छतावर जावे जेणेकरून हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीमला ते दिसतील. पूरग्रस्तांच्या बचावकार्याला रेस्क्यू टीम आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे.

१२ स्थानिक रेस्कु टीमसह एनडीआरएफच्या ३ कोस्टगार्डची २ पथके आणि नौदलाचे एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्कु काम सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

चिपळूण, खेडमध्ये ढगफुटी झाल्याने पावसाने महाप्रलय आला आहे. चिपळूणमध्ये 400 मि.मी. पाऊस कोसळला असून, आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. 2005 मध्ये आलेल्या पुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे.

चिपळूणमधील वाशिष्ठी, शिव नदी तर खेडमधील जगबुडी नदीला महापूर आला आहे.

महाड शहरासह माटवण, कोंडीवते, राजेवाडी, आकले, बिरवाडी आदि एकुण 60 गावांना पूराने वेढले असून, रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क पूर्णपणे तूटला आहे.

पुरामध्ये नेमके किती लोक अडकले आहेत याची नेमकी माहिती सद्यस्थिती उपलब्ध नसली तरी ही संख्या 3 हजारपेक्षा अधिक असण्याचा अंदाज पोलीस यंत्रणेचा आहे.

महाड तालुक्यांचा वीज पुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव खंडीत करण्यात आला आहे.

महाड शहरासह Mahad Flood सर्व गावांत अंधारचे साम्राज्य पसरल्याने वातावरण अत्यंत गंभीर बनलेले आहे.

विजेअभावी मोबाईल टॉवर्स बंद पडले आहेत. मोबाईल टॉवर्सच्या जनरेटर केबिन्स पाण्याखाली गेल्याने मोबाईल सेवा पूर्णपणे बंद आहे.  महाडकरांच्या परगावी असणार्‍या नातेवाईकांमध्ये संपर्काअभावी भितीचे वातावरण आहे.

हे वाचलं का?

PHOTOS : मराठी अभिनेत्री कार्टूनमध्ये कशा दिसतील?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button