पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गवरील रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर बस स्थानकमधून महाड आगारच्या अधिपत्य खाली शुक्रवारी सकाळ ११ पर्यंत ६ जादा बसेस बुकिंग निहाय सोडण्यात आल्याची माहिती पोलादपूर बस स्थानकातून देण्यात आली. तर महाड आगारमधून ७२ बसेस विविध मार्गवर सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती महाड आगारशमार्फत देण्यात आली.
गणपती उत्सवासाठी हजारो गणेश भक्त महिला तालुक्यातील वाडी वस्तीवर दाखल झाले होते. पाच दिवसांचे गौरी-गणपती सण साजरा करत पुन्हा नोकरीच्या, रोजगारच्या ठिकाणी परतीला निघाले असल्याने महाड आगारातर्फे पोलादपूर बस स्थानकामधून नियमित बसेससह जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून जवळपास ६ पेक्षा जास्त जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.
मुंबई, ठाणे, नालासोपारा, बोरीवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल आदी शहरात जादा बसेस सोडण्यात आल्या तर काही प्रवासी वर्गान खासगी ट्रॅव्हल द्वारे प्रवास करत मार्गस्त झाल्या. महिला वर्गाला ५० टक्के सवलत व ज्येष्ठ नागरिकांना सवलत असल्याने राज्य परिवहनच्या बस सेवेला प्रवासी वर्गाची पसंती मिळाली आहे.
शनिवारी व रविवारी पोलादपूरसह महाडमधून जादा बसेस प्रवासी वर्गाच्या उपलब्धतेनुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती महाड आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली.
योग्य नियोजन व योग्य टायमिंग मुळे या वर्षी सवलतीचा फायदा मिळत असल्याने अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी प्रवासी वर्गसाठी एसटी ला पसंती दिली आहे. महाडसह पोलादपूर बस स्थानकामध्ये प्रवासी वर्गाची गर्दी होत होती.