भोर तालुक्यातील निरा नदीला पूर

भोर तालुक्यातील निरा नदीला पूर
Published on
Updated on

भोर : पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्यात डोंगरमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसाने पाणीपातळीत मोठी वाढ होऊन निरा नदीला पूर आला आहे. सलग आठ दिवसांपासून भोर तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. ओढे- नाले, नद्यांना पूर आला आहे.

पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून निरा देवघर धरणातील पाणी साठ्यात 13, तर भाटघर धरणात 17 टक्के वाढ झाली आहे. तालुक्यात संततधार पावसामुळे हिर्डोशी खोर्‍यात धूळ वाफेवर टाकलेल्या भात रोपांच्या लावणीच्या कामाला सुरुवात झाली. तर शेतीमध्ये पाणीच पाणी झाले असल्यामुळे पश्चिम भागातील तरवे पाण्याखाली गेले आहेत. तसेच काही ठिकाणी खरीप हंगामातील कडधान्याच्या पेरण्या पावसामुळे लांबल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news