पुणे शहर, पिंपरीसह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाची हजेरी

पुणे : मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी हजेरी लावल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली.
पुणे : मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी हजेरी लावल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली.
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंडवडमध्ये शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली. वाढत्या तापमानात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसाचा चांगलाच तडाखा बसला. शहरातील उपनगरांसह शिवाजीनगर, लोहगावमध्ये पावसाने कमी कालाधीत दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले.

कात्रज, अप्पर डेपो, बिबवेवाडी, सुखसागरनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे-सातारा रोड, मार्केट यार्ड रोड, स्वारगेट, पाषाण, लोहगाव, शिवाजीनगर, मगरपट्टा आदी भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यात खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रातून येणार्‍या बाष्पाचे प्रमाण आणि वार्‍यांचा वेग कमी असल्याने तब्बल दहा दिवस मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवारपर्यंत रखडला होता. मात्र, गुरुवारपासून पोषक वातावरण तयार झाल्याने शुक्रवारी पहाटेपासूनच मोसमी पावसाने वेगवान प्रवास करून दक्षिण कोकणात धडक मारली.

त्याचबरोबरीने राज्याच्या इतर भागात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील काही भागामध्येही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शहरात यंदा पूर्वमोसमीच्या हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. जून महिना सुरू होऊनही पावसाच्या दमदार सरी बरसल्या नव्हत्या.

गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर आकाश ढगाळ होत असले, तरी पावसाचा केवळ हलका शिडकावा झाला होता. शुक्रवारी मात्र दुपारपासूनच आकाशात ढग जमण्यास सुरुवात झाली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास आंधारून आले. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह टपोर्‍या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली.

सुमारे अर्धा तास शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, शनिवारीही विजांच्या कडकडाटात शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ते 16 जून दरम्यान शहरात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

येथे झाला दमदार पाऊस
शिवाजीनगर- 25.6 मिमी
पाषाण – 7.6
लोहगाव – 32.4
मगरपट्टा – 3.5 मिमी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news