स्वारगेट ते सिव्हिल कोर्टपर्यंत भूमिगत मार्गातून करा सफर

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन
Metro
मेट्रो Pudhari
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26 सप्टेंबर) उद्घाटन झाल्यानंतर स्वारगेट मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक, असा भूमिगत प्रवास करता येणार आहे. मध्यवस्तीतून प्रवास करताना सातत्याने होणार्‍या कोंडीपासून पुणेकरांची सुटका होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे चाकरमान्यांना पुढे थेट पिंपरीपर्यंत प्रवास करता येणार आहे.

स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक गणेशोत्सवाच्या काळात सुरू व्हावे, अशी पुणेकरांची इच्छा होती. मात्र, काही तांत्रिक कामे आणि परवानगी बाकी असल्यामुळे येत्या 26 तारखेला या मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लागला आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी पुणेकरांची इच्छा आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर लगेचच हा मार्ग सुरू करावा, अशी मागणीही पुणेकरांकडून केली जात आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाच्या उद्घाटनासोबतच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गाचे भूमिपूजन देखील या वेळी पंतप्रधान करणार आहेत.

भूमिगत स्थानकांमध्ये या सुविधा मिळणार

  • सरकते जिने, लिफ्टची सुविधा

  • सीसीटीव्ही

  • माहितीदर्शक एलईडी स्क्रीन

  • सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवर

  • सेफ्टी डोअर

  • एसी (वातानुकूलित यंत्रणा)

  • फायर यंत्रणा

  • साधे जिने

  • ऑनलाइन, ऑफलाइन

  • तिकीट काउंटर सुविधा

  • सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट 10 मिनिटांत

  • (स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रो)

  • स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ तीन स्थानके

  • अंतर 3.34 किलोमीटर

  • सर्व भूमिगत स्थानकांची कामे पूर्ण

  • प्रवासी सोयीसुविधा आणि सुरक्षाविषयक कामे पूर्ण

  • स्वारगेट स्थानक येथील पीपीपी तत्त्वावरील

  • मल्टिमोडल हब या इमारतीचे काम अजून बाकी

  • सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास केवळ 10 मिनिटांत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबरला सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या मार्गावरील भूमिगत स्थानकांची सर्व कामे पूर्ण झाली असून, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट यादरम्यानचा प्रवास 10 मिनिटांत करता येणार आहे.

हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, महामेट्रो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news