Latest Pune News: सिंहगड रस्त्यावरील पासलकर चौक शेजारील नाल्या शेजारी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या तंबूसमोर असलेल्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी वाहना शेजारी असलेल्या एका सिलेंडरचा देखील जोरदार स्फोट झाला. परिणामी सिंहगड रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची तारांबळ उडाली. त्यामुळे या ठिकाणी बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली.
येथून जाणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ या संदर्भातील माहिती स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाला दिली. वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशामक दलाचे जवान येईपर्यंत वाहना शेजारीच असलेल्या एका सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला.
अग्निशामक दलाचे जवान आल्यानंतर त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.