पुणे ग्रामीण बॉम्बशोधक व नाशक पथकातील चाणाक्ष व अत्यंत हुशार श्वान वीरा हिची पोलीस मेळाव्यात घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे ग्रामीण दलातर्फे निवड करण्यात आली. श्वान वीरा हिने स्पर्धेत वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये बॉम्ब शोधण्याचे उत्कृष्ट काम केले. यामध्ये तिचा तिसरा क्रमांक आला. श्वान वीरा हिला कांस्यपदक मिळाले.
19 वा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा 2024 नुकताच पार पडला. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे (Pune) ग्रामीण जिल्ह्यांचा सहभाग होता. या मेळाव्याच्या अनुषंगाने कोल्हापूर येथे स्पर्धा घेण्यात आली. पुणे ग्रामीण बॉम्बशोधक व नाशक पथकातील चाणाक्ष व अत्यंत हुशार श्वान वीरा हिची या स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण दलातर्फे निवड करण्यात आली. श्वान वीरा हिने स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये बॉम्ब शोधण्याचे चांगले काम केले. यामध्ये तिचा तिसरा क्रमांक आला.
श्वान विरा हिला कांस्यपदक प्राप्त झाले. बक्षीस वितरण कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस (Police) महानिरीक्षक सुनील फुलारी तसेच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित, सांगलीचे संदीप घुगे, सातार्याचे समीर शेख, सांगलीचे अतुल कुलकर्णी व पुणे ग्रामीणचे पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
श्वान विरा व पोलीस हवालदार गणेश फापाळे, गोरखनाथ भामगर यांना कांस्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या कामगिरीबद्दल श्वान विरा व हवालदार फापाळे आणि गोरखनाथ भामगर तसेच पथकातील हवालदार चंद्रशेखर मगर व सतीश गेगजे (टेक्निशियन) यांचे कौतुक केले. सलग दुसर्या वर्षी श्वान विरा हिने पदक प्राप्त केले असल्याचे फापाळे यांनी सांगितले.