शेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात

Maharashtra Assembly Polls | ७ उमेदवारांची केली घोषणा
Maharashtra Assembly Polls |
रघुनाथ पाटील यांनी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.Pudhari Photo
Published on
Updated on

पुणे : राजकीय पक्ष म्हणजे टोळ्या आणि त्यांचे पदाधिकारी म्हणजे टोळ्यांचे नायक अशी कडक टीका करत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. ग्राहक चळवळ व सरपंच परिषद यांनी संघटनेला पाठिंबा दिला आहे. असे सांगत पाटील यांनी ७ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली.

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय

ग्राहक चळवळ आणि सरपंच परिषद या संघटना आमच्याबरोबर आहेत. अन्य समविचारी संघटनाही बरोबर येत आहेत. असे पाटील यांनी सांगितले. यावेळी ग्राहक चळवळीचे शिवाजी खेडकर, सरपंच परिषदेचे दत्ता काकडे, अजितराव काळे, पांडुरंग रायते त्यांच्यासमवेत होते. खेडकर यांनी ग्राहक चळवळ शेतकरी संघटनेच्या बरोबरीने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. पाटील म्हणाले, सध्याची राज्याची राजकीय स्थिती अतिशय दुर्दैवी आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या या विषयावर एकही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. शेतकर्‍यांच्या कर्जाविषयी यांना काहीही देणेघेणे नाही. फुकट पैसे वाटणार्‍या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्या जात आहेत. शेतकरी कुटुंबे मात्र कर्जाच्या ओझ्याखाली जगत आहेत. शेतकरी संघटना ही स्थिती पाहूच शकत नाही. त्यामुळेच सर्व सहकार्‍यांना बरोबर घेत निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Assembly Polls |
Maharashtra Assembly Polls | निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

संघटनेचे सात उमेदवार जाहीर

अकोट- लक्ष्मीकांत कौठेकर, पाथरी - मोहन मानोल, इंदापूर- अ‍ॅड. पांडुरंग रायते, कराड उत्तर- वसीम इनामदार, करवीर-अ‍ॅड. माणिक शिंदे, हातकणंगले- डॉ. प्रगती चव्हाण, पलुस कडेगाव-परशूराम माळी या उमेदवारांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news