13 हजार सुसाट वाहनचालकांना पुणे आरटीओचा दणका

शहरातही मोहीम राबविण्याची मागणी
Pune News
13 हजार सुसाट वाहनचालकांना पुणे आरटीओचा दणकाFile Photo
Published on
Updated on

पुणे: महामार्गावर अतिवेगाने वाहने पळविणार्‍या 13 हजार 818 वाहनचालकांवर पुणे आरटीओने कडक कारवाई केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असली तरीही बेदरकार चालकांची संख्या कमी होत नाही. आरटीओने स्पीडगनच्या माध्यमातून महामार्गाप्रमाणेच शहरात देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार अतिवेग (ओव्हर स्पीड), हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, इन्शुरन्स नसणे, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहने लावणे, ओव्हरलोड, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहनाला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसणे, वाहनाच्या काचा पूर्णत: काळ्या करणे, टेल लॅम्प/ ब्रेक लाइट चालू नसणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबरप्लेट, ड्रंक अँड ड्राइव्हसह विविध नियमभंगप्रकरणी आरटीओकडून कारवाई केली जाते. यातील फक्त अतिवेगाने धावणार्‍या 13 हजार 818 वाहनचालकांवर आरटीओकडून स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.

हुल्लडबाजांना आवरण्याची गरज

आरटीओकडून नियमभंग करणार्‍या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई आरटीओकडील वायुवेग पथके सर्वाधिक महामार्गावरच करतात. शहरात वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई होत असते. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांशीच वाद घालून पसार होतात. या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी काही पथकांना शहरात देखील गस्त घालायला लावावी, अशी मागणी होत आहे.

लायसन्स तपासणीसाठी मोहीम राबवा...

शहरात हुल्लडबाजपणा करत, ट्रिपल सीट गाडी पळवत इतर वाहनचालकांना त्रास देणार्‍या बहुतांश तरुणाईकडे लायसन्सच नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे पुणे आरटीओने शहरात तरुणाईचे फक्त लायसन्स (परवाना) तपासणीसाठीच विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी ज्येष्ठ वाहनचालकांकडून केली जात आहे.

शहरातील काही शाळा, महाविद्यालये आणि झोपडपट्टी भागाजवळील रस्त्यावर अनेकदा हुल्लडबाज तरुण ट्रिपल सीट येतात. वेगाने वाहन पळवत, इतर वाहनचालकांना कट मारतात आणि एखादा ज्येष्ठ नागरिक काही बोलला तर त्यालाच शिव्या घालून दादागिरी करतात. कधी कधी हाणामारीही करतात. अशा बहुतांश जणांकडे लायसन्सच नसते. अशा बेशिस्त हुल्लडबाज तरुणाईचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे आरटीओने शहरात कारवाई करायला हवी.

- नितीन इंगुळकर, ज्येष्ठ वाहनचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news