पुणे : जमिनीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील ७ आरोपींना जन्मठेप

खेड तालुक्यात १५ वर्षांपुर्वी घडला होता 'मुळशी पॅटर्न'
Pune double murder case
जमिनीच्या वादातून १५ वर्षांपुर्वी दोघांचा खून करण्यात आला होता.File Photo
Published on
Updated on

राजगुरुनगर : जमिनीच्या वादातून दोघाना पळवून नेऊन आडरानात लाकडी दांडकी आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या ९ पैकी ७ आरोपींना राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी शुक्रवारी (दि २७) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आरोपीचा मृत्यू झाला असून एक अल्पवयीन आहे. माण (ता. मुळशी) येथील जमिनीच्या वादातून चाकण जवळच्या पिंपरी खुर्द हद्दीत ११ जुलै २००९ रोजी भर दुपारी ही दुहेरी खुनाची खळबळजनक घटना घडली होती.

Pune double murder case
Thane Crime News | ऑनलाईन रमीत कर्जबाजारी झाल्याने तरुणाचे हत्याकांड

रोहिदास उर्फ गणपत उर्फ बाळू जयसिंग ठाकर (वय ३९, मयत), राजु जयसिंग ठाकर (वय ३६), संतोष जयसिंग ठाकर (वय २४), प्रितम उर्फ रोड्या पंडीत ठाकर (वय १९), जगदीश उर्फ गोट्या शिवाजी ठाकर (वय २१), चंद्रशेखर शिवाजी ठाकर (वय १९), तुषार प्रल्हाद ठाकर (वय १९) आणि रघुनाथ दामू पारखी (वय ५७, सर्व रा. माण, ता. मुळशी) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत पंढरीनाथ सदाशिव पारखी (वय ६०) आणि चंद्रकांत उर्फ पप्पु ज्ञानोबा पारखी (वय ३७) या दोघांचा खून करण्यात आला होता.

माण गावात वास्तव्य असलेली ही दोन कुटुंब आहेत. मयत चंद्रकांत उर्फ पप्पु पारखी याने खरेदी केलेली ७३ गुंठे जमीन मयत आरोपी रोहिदास ठाकर याला विक्रीच्या हेतूने साठेखत करून दिली होती. रोहिदास याला मुदतीत हा व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यावरुन पुणे न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाने खून झालेल्या पारखी याच्या बाजूने निकाल दिला होता. त्याचा राग ठाकर परिवाराला होता. घटनेच्या दिवशी मयत चंद्रकांत आणि चुलते पंढरीनाथ हे चाकण शेळी बाजारात चारचाकी वाहनाने शेळ्या विक्रीसाठी आले होते. त्यांच्यासोबत आरोपी झालेले रघुनाथ पारखी हेही होते. पुढे याच आरोपीने खुनाचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

बाजारातील काम उरकल्यावर चाकण ते रोहकल रस्त्यावर असलेल्या मयत पंढरीनाथ पारखी यांच्या मुलीकडे तिघेजण थांबले. तेथून बाहेर पडले तेव्हा काही अंतरावर आरोपींनी त्यांना गाठले. जबरदस्तीने पिंपरी खुर्दच्या आडरानात नेऊन सर्वांनी दोघांवर लाकडी दांडकी आणि दगडांनी हल्ला केला. कुणालाही घटनेचा थांगपत्ता लागू नये, यासाठी पुरावे नष्ट केले. मयत पंढरीनाथ यांचा मुलगा संदीप पारखी याने चाकण पोलिसात फिर्याद दिली होती. दोन परिवारातील वाद माण परिसरात माहिती असताना देखील सुरुवातीला वेगळ्याच आरोपींना अटक झाली होती; मात्र हा तपास पुढे सीआयडीकडे देण्यात आला.

पोलिस निरिक्षक दिपाली घाडगे यांच्या पथकाने नेमके आरोपी शोधून काढले. आरोपींना अटक करण्यात आली. ते दोन वर्षांनी जामिनावर बाहेर पडले. २०१४ मध्ये राजगुरुनगर न्यायालयात हा खटला सुरू झाला. महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. विजय सावंत यांनी खून झालेल्या पारखी यांची बाजु न्यायालयात मांडली. एकुण २० साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष आणि पुराव्यांनुसार निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी जन्मठेप, दोन हजार रुपये दंड, अपहरण व कट कारस्थान यासाठी ५ वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. चाकण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपास काम पाहिले.

Pune double murder case
बकऱ्या चारण्याच्या वादातून मुलाने केला वडिलांचा खून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news