मानसिक तणावाखाली असलेल्या पोलिस कर्मचारी अनुष्का सुहास केदार (वय 20, रा. लक्ष्मीनारायणनगर, दिघी) यांनी इंद्रायणी नदीच्या पुरात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न रविवारी (दि. 25) केला. मात्र, अद्याप तिचा शोध लागलेला नाही. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनुष्काने इंद्रायणी नदीत उडी मारल्याचे घाटावर तैनात असलेल्या पोलिसांनी पाहिले. त्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, ती अद्याप मिळू शकलेल्या नाही. इंद्रायणी नदी घाट, चर्होली नदी घाट, धानोरे नदी घाट तसेच तुळापूर येथील भीमा-भामा संगम ते पुणे ग्रामीण पोलिस हद्दीत येणार्या उजनी धरणपर्यंतच्याजात असल्याचे आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळपासून पुन्हा आळंदी पोलिस, नगरपरिषद, एनडीआरएफ, रेस्क्यू टीमद्वारे तिचा इंद्रायणी नदीपात्रात शोध सुरू होता. मात्र, तिला शोधण्यात अपयश आले. बुधवारी देखील शोधकार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले. नदीपात्रात व मावळ घाटमाथ्यावर संततदार पाऊस आणि हजेरी लावल्यामुळे इंद्रायणीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. एनडीआरएफकडील 30 जवान व 4 बोटींद्वारे इंद्रायणी घाट आळंदी येथे शोध सुरू आहे. तर, नगरपरिषदेकडील 1 बोट व 6 जवान चर्होली खुर्द, चर्होली बुद्रुक, बायपास या ठिकाणी शोध घेत आहेत. आपत्ती व्यवस्थापन संघाकडील 11 जवान सोळू, वडगाव, गोलेगाव व इंद्रायणीच्या पात्रामध्ये शोध घेत आहेत. तरस आळंदी पोलिसांचे पथक इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूने शोध घेत आहेत.