Mahashivaratri : तळेगाव येथे महादेवाच्या गजरात महाशिवरात्री

Mahashivaratri : तळेगाव येथे महादेवाच्या गजरात महाशिवरात्री
Published on
Updated on

तळेगाव पुढारी वृत्तसेवा : तळेगाव स्टेशन परिसरातील श्री हरणेश्वर टेकडीवर महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivaratri) श्री हरणेश्वर (श्री महादेव) मंदिर येथे सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली होती. हर…हर… महादेवच्या गजरात मंदिर परिसर दूमदूमुन गेला होता.

सकाळी राजेंद्र नवले यांचे हस्ते महाअभिषेक करण्यात आला. दुपारी महाआरती शंख वाजविणे आदी धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. वातावरण शिवमय (Mahashivaratri) झाले होते. फराळाचे आणि दूधाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे, शैलेश भेगडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र नवले, स्वप्निल मावळकर, रितेश काटे, सुनिल कदम, सुधीर सोनवणे, अभिजित भेगडे, विशाल उभे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचलंत का : 

पहा व्हिडिओ 

स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना खिद्रापुरचं कोपेश्वर मंदिर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news