दिल्लीत होणार्‍या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह ठरले

राज ठाकरे यांनी केली प्रसाद गवळींनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड
98th All India Marathi Literary Conference
98 व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनPudhari
Published on
Updated on

दिल्लीत होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली असून, मिळालेल्या बोधचिन्हापैकी मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्टचे (लोणी काळभोर) प्रसाद गवळी यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची संमेलनासाठी निवड केली आहे. महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपरिक लेखणीचा बोधचिन्हात समावेश आहे आणि या बोधचिन्हाची निवड मनसेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केली आहे.

साहित्य संमेलनासाठी सरहद पुणे ही आयोजक संस्था आहे. दिल्लीत होणार्‍या या संमेलनाच्या बोधचिन्हासाठी राष्ट्रीय पातळीवर बोधचिन्ह निवड स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती. या स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांकडून उल्लेखनीय अशी बोधचिन्हे संस्थेकडे प्राप्त झाली होती. यापैकी संमेलनासाठीचे बोधचिन्ह निवडण्याची महत्त्वाची जबाबदारी सरहदकडून राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार ठाकरे यांनी प्रसाद गवळी यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड केली आहे.

सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, प्रसाद गवळी यांचा विशेष सन्मान दिल्लीतील साहित्य संमेलनात केला जाईल, अशी माहिती सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.

महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपरिक लेखणी बोधचिन्हात स्पष्ट दिसत आहे. तसेच, हे बोधचिन्ह सरळ आणि साधे असल्यामुळे निवडण्यात आले आहे.

राज ठाकरे, व्यंगचित्रकार, अध्यक्ष, मनसे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news