सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या चौथ्या टप्प्यातील भूमिगत मार्गाचे उद्घाटन उद्या रविवारी (दि. 29) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. तसेच, भिडेवाड्याचे भूमिपूजन करण्याचेही नियोजन याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट मेट्रो स्थानकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या स्थानकांवर पार्किंग आहे. आगामी काळात ते प्रवाशांसाठी उपलब्ध केले जाईल. तसेच, उद्घाटन झाल्यावर लगेच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानकादरम्यानची प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे.
हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, महा-मेट्रो
पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोने करणार प्रवास
स्वारगेट सिव्हिल कोर्ट भूमिगत मार्ग होणार पुणेकरांसाठी लागेच खुला
पुणेकरांना करता येणार भुयारी मेट्रोमार्गातून प्रवास