पुण्यात हसन मुश्रीफांच्या नावाने निवृत्त शिक्षिकेकडून २० लाख उकळले

Pune Crime News | पुण्यातील हडपसर येथील घटना
Fraud  news
पुण्यातील हडपसर येथील निवृत्त वृद्ध शिक्षिकेला २० लाखांचा गंडा घातला. Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निवृत्त वृद्ध शिक्षिकेला पोलिस उपायुक्ताच्या नावाने कॉल करून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनीलाँड्रींग केले आहे, असे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तुम्हाला अटक करावी लागेल. असे म्हणत 20 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया पोलिस उपायुक्त नरेंद्र गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उषा मुरलीधर व्यास (वय 71, रा. प्राईम रेसीडेन्सी, विठ्ठलनगर, हडपसर) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनीलाँड्रींग केले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा व्यास मागील बारा वर्षांपासून हडपसर परिसरात राहतात. त्या राजस्थान येथून शिक्षक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. तसेच त्या पेन्शनर आहेत. 31 मे रोजी त्या घरात असताना त्यांना त्याच्या मोबाईलवर पीएसआय नरेंद्र गुप्ता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने व्यास यांच्याशी हिंदीत संवाद साधत तुम्ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी मनीलाँड्रींग केले आहे. तसेच बेकायदेशीर पिस्तूल खरेदीसाठी पैसे पुरवून तुम्ही ड्रगचा व्यापार करत आहे, असे सांगून त्या महिलेला धमकावले. (Pune Crime News)

पेन्शन बंद करण्याची भीती  घातली   

हसन मुश्रीफ आमच्या ताब्यात असून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात तुम्हाला अटक करावी लागेल, अटक झाल्यावर तुम्हाला मुंबई येथे ठेवण्यात येईल. तुमची पेन्शन बंद करण्यात येईल, असे खोटे सांगून गुन्हा दाखल करण्यात आल्याची पीडीएफ पाठवली. त्याच्या बोलण्यामुळे व्यास ह्या घाबरल्या. त्यांनी गुप्ता नावाच्या त्या व्यक्तीला मी यातून कशी वाचेल, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने तुम्हाला यातून जामीन मिळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात जेवढे पैसे असतील ते आमच्या खात्यात पाठवले लागतील, असे म्हणत व्हेरीफिकेशन नंतर तुम्हाला पुन्हा पैसे परत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. (Pune Crime News)

4 जूनरोजी ऑनलाइन तक्रार

गुप्ता नावाच्या व्यक्तीने पाठविलेल्या खात्यावर व्यास यांनी तब्बल 20 लाख पाठविले. दि. 31 मे ते 3 जून दरम्यान व्यास यांना कोणाला फोन करता येत नव्हता की, त्या गुप्ता नावाच्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणाचा फोन येत नव्हता. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्क साधता आला नाही. व्यास या घाबरल्यामुळे त्यांनी ही बाब कुणाला सांगितली नाही. पैसे पाठविल्याबाबत फोन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने तुम्ही निवांत झोपा असे सांगून फोन ठेवला. नंतर त्यांनी संबंधित आरोपींच्या दोन नंबरवर फोन केला. तेव्हा त्यांचा फोन उचलला गेला नाही. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी 4 जूनरोजी ऑनलाइन तक्रार दिली. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत. (Pune Crime News)

Fraud  news
Pune Porsche accident | पुणे पोर्शे अपघात प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात जाणार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news