Crime News | सोशल मीडियाच्या ओळखीतून मुलीवर बलात्कार
पुणे : अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यावरून पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरुद्ध पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑगस्ट २०२३ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत आहे. घडली बलात्कारासह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि आरोपी तरुणाची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती.
काही दिवसांनी त्यांच्यातील संवाद वाढून त्याचे प्रेमात रूपांतर झाले. दरम्यान, पीडित मुलगी ही शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातून तिचे राहते घरी जात असताना आरोपीने तिला फोन करून त्याच्या राहते घरी बोलवले.
मुलगी घरी गेल्यानंतर तिच्यासोबत त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला त्याच्या दुचाकीवरून तळजाई टेकडीवर फिरावयास नेऊन, त्यानंतर पुन्हा त्याच्या राहते घरी नेऊन मुलीसोबत पुन्हा शारीरिक संबंध केले.
त्यामुळे पीडित मुलगी १७ ते १९ आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.