‘ये घिबली घिबली क्या है? मंत्री-संत्रीही प्रेमात!

सोशल मीडियावर अ‍ॅनिमेटेड फोटोंचा ट्रेंड
Pune News
‘ये घिबली घिबली क्या है? मंत्री-संत्रीही प्रेमात!Pudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे: सोशल मीडियावर सतत नवनवे ट्रेंड येत असतात, मग त्याचे अनुकरण सर्वसामान्यांकडून सर्रासपणे केले जाते. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला नवा ट्रेंड म्हणजे ‘घिबली.’ मंत्री-संत्रीही यांच्या प्रेमात पडलेले आहेत. कार्टून फोटो म्हणजेच ‘घिबली.’ एआयच्या माध्यमातून फोटो तयार करून सोशल माध्यमांवर टाकण्याची फॅशनच सध्या आलेली दिसते.

या आकर्षक व लोभसवाण्या फोटोंची भुरळ सध्या भल्याभल्यांना पडलेली दिसते. कॉलेज तरुणांबरोबरच नोकरवर्ग व मोठमाठे व्यावसायिक आणि राजकीय नेतेदेखील आपले कुटुंबासोबतचे, फिरायला गेलेले, मोठ्या व्यक्तीसोबतचे फोटोंचे कार्टून बनवून समाज माध्यमांवर पोस्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आणि अनेकांच्या स्टेटस स्टोरीला वेगळेच चित्र पाहायला मिळू लागले आहे.

इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टि्वटर यांसह अन्य सोशल मीडियावर सध्या हा घिबली ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. प्रत्येक जण या ट्रेंडचा वापर करून आपल्याकडील संग्रहित छायाचित्रांची कार्टून बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत आणि त्याला नेटकर्‍यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशा फोटोंवर असंख्य लाइक आणि कमेंटसचा पाऊस पडत आहे.

इतकेच नव्हे, तर अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत काढलेले छायाचित्रे आणि कुटुंबांसह सोबत काढलेले छायाचित्रे देखील कार्टून बनवून व्हायरल करताना दिसत आहेत. तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनाही घिबलीने भुरळ घातली आहे.

अनेक ज्येष्ठांनीही आपले कार्टून छायाचित्र बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलेले दिसते. सोबतच काही प्रसिद्ध परदेशी उद्योजकांनीसुद्धा आपले छायाचित्र घिबली करून म्हणजेच कार्टून बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे

‘घिबली’ फोटो म्हणजे काय रे भाऊ?

‘घिबली’ छायाचित्र ‘चॅट जीपिटी’ या ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अ‍ॅपच्या माध्यमातून बनवले जात आहे. काही वापरकर्त्यांना सबस्क्रीप्शन नसतानाही असे फोटो बनवता येत आहेत. मात्र, काहींना याचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागत आहे. तसेच, असे फोटो बनवण्यासाठी अनेक ‘एआय टूल्स’ उपलब्ध आहेत. त्याचादेखील नेटकर्‍यांकडून वापर केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news