राज्यात सुसंस्कृत महाशक्ती म्हणून परिवर्तन संघटन उभे राहिले आहे. राज्यातील जनतेचा ओढ आमच्याकडे असून अनेकजण पक्षात येत आहे. मागील 75 वर्ष राज्य त्याच मूलभूत गोष्टीवर अडकून पडले आहे. हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवसेना पक्षातून स्वराज पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले आहे. त्यांना हिंगोली किंवा कलमनुरी विधानसभा मतदारसंघमध्ये निवडणूक लढण्यासाठी उभे राहतील, अशी माहिती महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी स्वराज पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव उपस्थित होते. माने यांनी सांगितले, आमच्या सारख्या लोकांना संभाजी राजे यांच्या सोबत येणे गरजेचे आहे. कयाधू नदी ही हिंगोलीची लाईफ लाईन आहे. त्यावर चांगल्या प्रकारे बंधारे बांधले पाहिजे. लोकांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजे. राजे यांनी आम्हाला परिवर्तन हाक दिली त्यांना आम्ही साथ देत आहे. राज्यातील राजकारणात घराणेशाही विरोधात आमची लढाई आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून जागा लढली आणि त्यात कमी मताने ही जागा यापूर्वी हरलेलो आहे. हिंगोली व कळमनुरी मतदारसंघाचे जे मुलभूत प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी सोडवले नाहीत. म्हणून यावर्षी विधानसभा निवडणूक लढणार आहे.
जाधव म्हणाले, मागील काही वर्षात केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकारणासाठी वापर केला गेला. पण ठोस कोणते काम सत्ताधारी यांना करता आले नाही. परिवर्तन लढाई आणि प्रस्थापित विरोधात लढण्यासाठी परिवर्तन महाशक्ती काम करत आहे.