BJP Mandal Presidents: भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर; शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केली घोषणा

विधानसभा निहाय 26 मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे
BJP Mandal Presidents
भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर; शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केली घोषणाFile Photo
Published on
Updated on

पुणे: शहर भाजप मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सर्व मंडलांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. हडपसर (4 मंडल), कसबा (3 मंडल), शिवाजीनगर (3 मंडल), कोथरूड (3 मंडल), वडगावशेरी (4 मंडल), कॅन्टोन्मेंट (2 मंडल), पर्वती (3 मंडल) आणि खडकवासला (4 मंडल) अशा विधानसभा निहाय 26 मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

मंडल अध्यक्ष पुढीलप्रमाणे- लोहगाव - धानोरी- संदीप मोझे, विमाननगर सोमनाथ नगर- नितीन जाधव, खराडी वडगाव शेरी- आशिष देशमुख, येरवडा- रमेश गव्हाणे, शिवाजीनगर दक्षिण- शैलेंद्र बडदे, शिवाजीनगर उत्तर - आनंद छाजेड, खडकी- शाम काची, कोथरूड उत्तर (बाणेर बालेवाडी पाषाण)- लहु बालवडकर, कोथरूड मध्य- नीलेश कोंढाळकर, कोथरूड (एरंडवणे, कर्वेनगर)- कुलदीप सावळेकर, पर्वती - सिंहगड रोड- राजू कदम, मार्केट यार्ड, निखिल शिळीमकर, तळजाई- प्रशांत थोपटे.

कोरेगाव पार्क घोरपडी वानवाडी डायस प्लॉट- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड- सुशांत निगडे, ससुन - पुणे स्टेशन - ताडीवाला रोड भवानी रोड - काशीवाडी- सोमवार पेठ मंगळवार पेठ - रास्ता पेठ - विशाल कोंडे, कसबा गणपती- अमित कंक, समता भूमी- छगन बुलाखे, क्रांतिवीर उमाजी नाईक- प्रशांत सुर्वे, धनकवडी बालाजीनगर - महेश भोसले, वारजे - बावधन - भुसारी - गणेश वर्पे, वडगाव बुद्रुक - धायरी- यशवंत लायगुडे, धायरी- शिवणे- रूपेश घुले.

कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक- प्रमोद टिळेकर, कोंढवा खुर्द, मोहम्मदवाडी- अमर गव्हाणे, घोरपडी, मुंढवा, मगरपट्टा, केशव नगर, माळवाडी, साडेसतरा नळी, भोसले गार्डन - संदीप लोणकर, वैदुवाडी, रामटेकडी, काळेपडळ, ससाणेनगर हडपसर गाव- आकाश डांगमाळी यांचा समावेश आहे.

आता अध्यक्ष निवडीची उत्सुकता

मंडळ अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी अनेक इच्च्छुक आहेत. विद्यमान अध्यक्ष घाटे यांनाही पुन्हा संधी आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष कोणाला संधी देणार, याबाबत उत्सुकता आहे. एप्रिलअखेरीस अथवा मेच्या पहिल्या आठवड्यात नवीन शहराध्यक्षांच्या नावाची mघोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news