पुणे : १५ ऑगस्ट रोजी राज्यात रिमझिम पावसाचा अंदाज असून, विदर्भ वगळता मोठ्या पावसाचा कुठेही अंदाज नाही. मात्र, विदर्भातील बहुतांश भागात १५ व १६ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यात मोठा पाऊस थांबला असला तरीही ढगाळ वातावरण कायम आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ऊन आणि रिमझिम पाऊस असे वातावरण दिसत आहे. स्वातंत्र्यदिनीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज नाही. मात्र रिमझिम पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी १३ ते १६ ऑगस्टदरम्यान यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात आधी नमूद केल्याप्रमाणे पाऊस १५ ऑगस्टपर्यंत कमी राहील. 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे आणि महिना अखेरपर्यंत चालू राहील. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २९% जास्त पाऊस झाला आहे, या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान जादा पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी अडचणीत ही आला आहे, असेही ते म्हणाले.