नालेसफाईच्या कामाला आला वेग; लोणावळा नगरपरिषदेकडून पावसाळापूर्व कामे सुरू

नालेसफाईच्या कामाला आला वेग; लोणावळा नगरपरिषदेकडून पावसाळापूर्व कामे सुरू
Published on
Updated on

लोणावळा : नगरपरिषदेच्या वतीने पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. शहरातून वाहणारी इंद्रायणी नदी व नालेसफाईच्या कामांना वेग आलेला दिसत आहे.

जलपर्णी काढण्याच्या कामांना प्राधान्य
घाटमाथ्यावरील पावसाचे आगार म्हणून लोणावळा शहराची ओळख आहे. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे अनेकदा शहरातून वाहणारी इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागते आणि शहराला पुराचा धोका संभवत असतो. याकरिता पावसाळापूर्व कामांमध्ये दरवर्षी इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम करावे लागते. दरवर्षी साधारणतः मे महिन्यात या कामाला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा एप्रिल महिन्यातच नदी-नाले सफाईचे काम सुरू आहे.

नागरिकांनी व्यक्त केले समाधान
बाजार भागात इंद्रायणी पुलाजवळ पोकलॅन मशिन नदीपात्रात जलपर्णी काढण्यासाठी उतरविण्यात आले आहे. तर, सफाई कर्मचारी व ठेकेदारी कामगारांच्या माध्यमातून नाले तसेच गटारे यांची सफाई करत आहेत. त्यामध्ये आलेले गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news